संस्कार वाणी परिवार पाचोरा यांचे तर्फे बारावीपास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

*संस्कार वाणी परिवार पाचोरा यांचे तर्फे बारावीपास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
आपल्यातील योग्यता, कौशल्य व आवड ओळखून भविष्यातील करिअर निवडा प्रा. राजेंद्र चिंचोले.
आइडियल इंडिया न्यूज़
Riporter- आबासाहेब सुर्यवंशी
पाचोरा (जळगाव )- इयत्ता बारावीचा महाराष्ट्र राज्य मंडळाचा व सीबीएससी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला .बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील वाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्कार वाणी परिवार पाचोरा यांचे तर्फे संपन्न झाला. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांच्या हस्ते संपन्न झाला .या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्कार वाणी परिवाराचे प्रमुख योगेश येवले, विजय सोनजे ,अनिल येवले, चंद्रकांत कोठावदे , संजय अमृतकर, शैलेश येवले, नाना सिनकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश येवले यांनी केले. संस्कार वाणी परिवारामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी योगेश येवले यांनी माहिती दिली.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपले करिअर निवडताना भविष्यातील ध्येय निश्चित करून आपली योग्यता, कौशल्य , सामर्थ्य ,आवड ओळखून व विविध पर्यायांची माहिती घेऊन करिअर निवडावे . इंजिनिअरिंग व मेडिकल याव्यतिरिक्त करिअरच्या असंख्य शाखा आहेत यांचा देखील विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचार करावा अशा प्रकारचे मार्गदर्शन प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद पाटे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचाली बद्दल मार्गदर्शन करून शुभेच्छा देतांना आपल्या गुणवत्तेचा उपयोग समाजसेवेसाठी करावा असा मोलाचा संदेश दिला.
या प्रसंगी साक्षी चंद्रकांत कोठावदे, साक्षी संजय अमृतकर ,आयुष गणेश सिनकर, अक्षरा अनिल येवले ,पुष्कर मिलिंद येवले ,वृंदा प्रमोद येवले , श्रेयस सोनकुळ , तेजस्विनी बापू वाणी ,अदिती निलेश सिनकर ,नंदिनी शरद पाटे हर्षदा नाना सिनकर, गायत्री भिकन येवले या विद्यार्थ्यांचा सत्कार स्टडी टेबल व प्रा. राजेंद्र चिंचोले लिखित करिअर चार्ट व पुष्पगुच्छ देऊन प्रा. राजेंद्र चिंचोले यांच्या हस्ते करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सोनजे तर आभार अभिलाष येवले यांनी मानले.