नोकरी चा लालच दाखवून पैसे घेतल्या नंतर घडवलं निर्दयी,थरारक हत्याकांड-विषारी कोब्रा नाग मार्फत डसवून दोन निष्पाप वयोवृद्ध व्यक्तीं ची हत्या “
” नोकरी चा लालच दाखवून पैसे घेतल्या नंतर घडवलं निर्दयी,थरारक हत्याकांड-विषारी कोब्रा नाग मार्फत डसवून दोन निष्पाप वयोवृद्ध व्यक्तीं ची हत्या ”
कल्याणचा नायडू टिसी व पडघा चिंचवलीचा पाटील यमलोकी रवाना.
आइडियल इंडिया न्यूज़
सुधाकर श्याम भोइर की रिपोर्ट
सविस्तर घटनाक्रम असा कि हक्काची नोकरी साठी कर्जबाजारी होऊन देखील नोकरी व पैसा गमावणा -या अनेक लोकांचा हा संवाद दररोज कुठे न कुठे ऐकायला मिळतो.
गेल्या काही दिवसांपासून नोकरी साठी लाखो रुपये लबाड नोकरी सम्राटांच्या घशात घालण्या-या कल्याण चक्की नाका येथील फसवणूक झालेल्या (मृत) गोपाळ रंग्या नायडू (वय६२) या सेवानिवृत्त रेल्वे टिसी व पडघा चिंचवलीचा (मृत)बाळू शंकर पाटील( वय७५) या दोघांच्या नोकरीसाठी दिलेले लाखो रुपयांचा वारंवार होत असलेल्या तगादा त्रासापासून कायमचीच सुटका करण्यासाठी निर्दयी नोकरी सम्राटांनी पैशांपायी नागोबाला डसवून दोघा निष्पाप तगादाखोरांना डायरेक्ट”यमलोकी “रवाना केले.
मॉडस ऑपरेंडी म्हणून अपयशी “शेखचिल्ली “शक्कल लढवून दोन जीवांना तडफडत मारण्याचं राक्षसी व अधम पाप शहापूर धसई येथील आरोपी अरूण जगन्नाथ फर्डे व टिटवाळात राहणारा रमेश मोरेश्वर मोरे या लबाड ,निर्दयी नोकरी सम्राटां ने केले पण जागरूक आणि दक्ष महाराष्ट्र पोलिसांनी ते उजेडात आणले.
कल्याणचा सुप्रसिद्ध सर्पमित्र गणेश बाजीराव खंडागळे व रमेश मोरेचे साथीदार सोमनाथ जाधव रा.टावरीपाडा कल्याण आणि नारायण तुकाराम भोईर रा.भुवनगाव मुरबाड व जयेश भास्कर फर्डे रा धसई ता.शहापूर या सर्वांच्या हाती पोलिसांच्या बेड्या ठोकल्या गेल्या आहेत.तथापि, नागोबाकांड प्रेमी खलनायक रमेश मोरे अद्याप ही फरार आहे.
घटना अशी झाली की टिटवाळा येथील रमेश मोरेश्वर मोरे हा नामचीन रणजी क्रिकेटपटूआहे.इंगलंड रिटर्न खेळाडू म्हणून त्याला कल्याण सुभाष मैदानात रुबाबदार मान मिळायचा.”थेट सचिन तेंडुलकर सुद्धा त्याला ओळखतो”असं मैदानावर नवीन खेळाडूंना तो फुशारकीने सांगायचा. खेळाडूंना क्रिकेट कोच करतांना रेल्वे टिसी गोपाळ रंग्या नायडू या क्रिकेट फैन शी कोच रमेश मोरे बरोबर ओळख झाली.
अनेक महिने ही दोघांची यारी दोस्ती आपोआपच दारुच्या पार्ट्या मध्ये स्थिरावली.टिसी गोपाळ नायडू कमालीचा दारु पार्टी शौकीन होता. मित्र मंडळ परिवार त्याचा जबरी मोठा होता.पार्टीत बसला की तो तब्येतीने झिंग होई पर्यंत दारू ढोसायचा. नायडू चा जाम भरोसा मोरे बाबतीत झाला होता. कित्येक जण, ” नायडू साब,आपकी बहुत पहचान है, नोकरी के लिए देखो, हमारे रिशतेदार जितना पैसा लगेगा उतना देगे..” असे बोलत असायचे.
दोस्त रमेश मोरे यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी नेमकी हीच संधी साधून टिसी गोपाळ रंग्या नायडू व बाळू पाटील यांना, त्यांचे मंत्रालय, रेल्वे, महापालिका,व इतर सरकारी अधिकारींचे जवळचे संबंध असून पैसे मैनेज केलें तर नोकरी हमखास मिळणार अशी खोटी खोटी बतावणी केली आणि वातावरण तयार केलं.नायडू व पाटील यांनी वेगवेगळ्या दिवशी मोरे चे कार्यालय गाठले.बाहेरच त्यांना अगदी अपटुडेट,पौश कडक कपडे घातलेला धसई चा अरुण फर्डे भेटला. “मोरे साहेब खूप खूप बिझी आहेत,कालच दिल्ली वरुन विमानाने आले,आज मंत्रालयात बैठक आहे” असा मोठेपणा सांगायचा. ओळखीच्या, नातेवाईक आणि मित्र मंडळ परिवाराला नोकरी सम्राट रमेश मोरे ला भेटून नोकरीची सुवर्णसंधी मिळणार असल्याचे सांगून नोकरी करिता लोकांकडून नायडूने १६ लाख रुपये तर पडघा चिंचवलीचा बाळू पाटील यांनी लोकांचे तब्बल २५ लाख रुपये रमेश मोरे व अरुण फर्डे ला दिले.
आता परिस्थिती अशी झाली की २०२१ ते २०२२ अखेर कोणालाही नोकरी लागली नाही. २०२३ ला नोकरी सम्राटांनी लाखो रुपयांचा चूना लावून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.दोघांनीही अक्षरशः मोरे व फर्डे ला नोकरी व पैशांसाठी साठी लोटांगण घातले, दोघांच्या घरांचे उ़ंबरे झिजवले.
नोकरी याचक लोक नायडू व बाळू पाटील यांना दररोज सकाळी, रात्री मोबाईल फोन वर, घरी , रस्त्यावर पैशांची ची मागणी करु लागले.
आता ह्या घटनेचा चित्त थरारक क्लाइमेक्स सुरू होतो.
दिनांक ३ जून रोजी “तुम्हाला काही पैसे देतो तुम्ही भेटा, बरेच दिवस झाले आपण एकत्र येऊन पार्टी केली नाही.मस्त पार्टी ही करु या “असा निरोप टिसी गोपाळ रंग्या नायडू ला दिला. आपल्या नेहमीच्या रिक्षाचालक बरोबर नायडू व मोरे, फर्डे पार्टी साठी निघाले.हाजी मलंग येथील खोणी गावाजवळ पार्टी केली.नायडूला दोघांनी जाम दारु पाजली.शुद्धि हरपली इतकी दारू पिऊन नायडू रिक्षातच सीटवर लवंडला.ही अवस्था पाहून
रमेश मोरे, व अरुण यांनी रिक्षातील पिशवीमधून काचेच्या बरणीत भरून ठेवलेला नागोबा बाहेर काढला व नायडुच्या दोन्ही बाजूला बसून नायडू चा हात झाकण काढून बरणीत कोंबायला सुरवात केली.बरणीतील कोब्रा नागोबा फणा काढून हाताला, मनगटावर डसला.जोराच्या नागदंशाने नायडूने अंग व पाय झटकून पुन्हा नशेत रिक्षात मुटकळी होत झोपी गेला.
स्वतःला डोकेबाज मिरविणारे मोरे व फर्डे ने लोकांचे नोकरीचे लाखो रुपये खर्चून टाकले होते.नायडु व पाटील यांच्या मागणीने, दररोजच्या तगादा त्रासापासून सुटका करण्यासाठी कमनशिबी डोकं लावलं.”साला रोज रोज का तकलीफ वाला साप भी मरेगा और लाठी भी नहीं टुटेगी.!”
सुभाष मैदानावर ओळख असलेल्या कल्याण च्या सर्पमित्र गणेश बाजीराव खंडागळेला अरुण फर्डे भेटला.शहापूर धसई ला माझा फार्महाऊसवर खूप घुशी उंदीर झाले आहेत.मला साप हवा आहे.तू सर्पमित्र आहे.तुला मी या बदल्यात पैसे देतो.
३ जून पूर्वी गणेश बाजीराव खंडागळेने विषारी कोब्रा नागोबा अरुण फर्डे ला ५००० हजार रुपये विकला.तो नागोबा नायडू ची हत्येसाठी कामाला आला.तसाच रिक्षातून नायडू बेशुद्धावस्थेत या तिघांच्या बरोबर निपचित पडून फिरत होता.नायडू काही केल्या मरत नव्हता.विषारी नाग डसवून देखील नायडू ची हालचाल व श्वास सुरू होती. रिक्षातून एका खोलीत नायडूला आणले.नायडू दिवस रात्र जिवंत राहिल्याने फर्डे व मोरेची त़ंतरली .
सर्प दंशाने मरण दाखवून मोहीम फुल टू फत्ते न होता अंगावर गोचीड गत चिकटणार होती. अखेर रमेश मोरेने निष्ठूर होत मध्य रात्री धारदार शस्त्राने गळा चिरून रेल्वे टिसी नायडूचे कायमचेच यमलोक स्टेशन चे तिकीट फाडून टाकले.आणि पहाटे पहाटे प्रेत धसई शिवनेर येथील अरूण फर्डेच्या शेतात पुरून टाकले .
नायडू च्या देवा नावाच्या मुलाने कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नायडू ची मिसिंग तक्रार दाखल केली होती.
पोलीसांची शोधाशोध सुरू झाली होती.
एक तगादाखोर नायडू चा काटा साफ करून झाल्यावर लाखो रुपये पचविण्यासाठी दुसरा डोकेदुखी ठरत असलेल्या पडघा चिंचवलीचा बाळू पाटील याला ढगात कायमचं धाडण्यासाठी तीच शक्कल लढवली. सर्पमित्र गणेश बाजीराव खंडागळेला गाठले.दिनाक ८ तारखेला चिंचवलीचा बाळू शंकर पाटील (वय ७५)यांना पडघा येथे भेटण्यासाठी फोन केला.गणेश कडून विषारी कोब्रा नागोबा विकत घेऊन “बाळू पाटीलला तुमचे पैसे देतो पडघा येथे रिक्षाने आलो आहे”असा निरोप दिला.लोकांच्या पैशांच्या सुटका करण्यासाठी पाटील रिक्षात दोघांच्या मध्ये बसला.अचानक दोघांनी पाटील ला गच्च पकडून आवळले.रिक्षातच बरणीत भरून ठेवलेला विषारी कोब्रा नागोबा जवळ बाळू पाटीलचा बरणीत हात कोंबून नागोबाला डसवला.दोन तीन वेळा नागोबा डसला. सर्पदंशाने पाटील रिक्षात कळवळला.बोबडी वळली.तोंडातून पांढराफटक फेस निघू लागला.हातपाय झटकले.शरीर आस्ते आस्ते मंदावताच रिक्षातून पाटीलला रस्त्यावर टाकून दोघांनी धूम ठोकली. नागोबा करवी दोन गेम वाजवल्या.आणि दोघांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
परंतु, नियतीचा खेळ चुकत नाही.
म्हणतात ना “पाप किसीका बाप नही होता है..!” नेमकं तसंच आक्रित घडलं या धसई मर्डर केस बाबतीत…
अरुण फर्डे ने नायडू व पाटीलच्या दोन्ही गेम वाजवल्या. मात्र, घरी आल्यावर तो अस्वस्थ व्हायचा.जेवण ही अरुणला जात नव्हतं.झोपायला डोळे मिटून घेतले की नायडू आपल्या शेतात पुरून ठेवलेल्या जागेतून बाहेर येण्यासाठी आवाज देत असल्याचा भास अरुणला होऊ लागला.घराच्या कोपऱ्यात, खुर्चीवर, गाडी वर नायडू दिसू लागला.अरुण बेचैन झाला.पण काही ही बोलू शकत नव्हता.या वागण्यामुळे घरातील लोक बुचकळ्यात पडले.शेतात नायडूला पुरलेल्या जागेवर जाऊन तो वारंवार खात्री करून घेत होता.शेवटी वैतागून अरुणने स्वतः हून दिनांक १० जून रोजी मध्यरात्री शेतात पुरून ठेवलेल्या जागेतून मातीचा ढिगारा उपसून गोपाळ रंग्या नायडूचा सांगाडा बाहेर काढून टाकला.कोणी अज्ञात व्यक्तींनी सांगाडा टाकल्याचे अरुण फर्डे ने खोटा कांगावा केला.दिनाक ११ जून ला शहापूर पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी नायब तहसीलदार बि घुटे यांच्या समक्ष पंचनामा करून रीतसर गुन्ह्याची नोंद केली.ठाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे,सहा पोलिस निरीक्षक भास्कर जाधव,पोलिस हवालदार प्रकाश साहिल व संतोष सुर्वे,प्रमोद हाबळे,सतिश कोळी,हेमंत विभुते,दीपक गायकवाड, स्वप्नील बोडके यांच्या सह शहापूर पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी संयुक्तपणे तपास सुरू केला.पोलिस उपनिरीक्षक आर केंद्रे, कमलाकर मुंडे,पो हवालदार शशीकांत पाटील,विकास सानप, दत्ता भोईर, अनिल राठोड, रमेश नलावडे यांनी शिताफीने नागोबा हत्याकांड उघडकीस आणले आणि गुन्हेगारांना गजाआड करून कायद्याच्या संरक्षणाच कार्य केलं.