आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन: अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी राहुल दाहोत्रे
आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन: अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी राहुल दाहोत्रे
पुणे महाराष्ट्र से राहुल शांताराम दाहोत्रे की रिपोर्ट
पुणे प्रतिनिधी – अखिल भारतीय ओबीसी सेवा संघटनेची बैठक दि 2 सप्टेंबर 23 रोजी पुणे येथील मीटिंग गंधर्व हॉटेल येथे सायंकाळी 4 वाजता संघटनेचे अध्यक्ष हनुमंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी लातूर येथील पत्रकार तथा आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन चे लातूर जिल्हा अध्यक्ष मराठवाडा संपर्क प्रमुख राहुल शांताराम दाहोत्रे यांची निवड करण्यात आली.
तसेच आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन प्रदेश महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व ओबीसी संघटना पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कादंबरी वेदपाठक यांची अखिल भारतीय महिला युवक आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेचे खजिनदार नरेश बिरे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील नलावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.