बंजारा समाजातील दोन सख्ख्या बहिणीने तायकंदो राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदकास घातली गवसणी*….

*बंजारा समाजातील दोन सख्ख्या बहिणीने तायकंदो राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदकास घातली गवसणी*….

नितीन रमेश जाधव

आयडियल जर्नालिझम असोसिएशन

बदलापूर शहर

भारताची राजधानी दिल्ली येथील नुकतीच छत्रसाल स्टेडियमवर राष्ट्रीय तायकंदो चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत सख्ख्या दोन्ही बहिणीने सुवर्णपदक पटकावले..
*सुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी*
अगदी या उक्तीप्रमाणे श्री. झुंबर भाऊ जाधव यांच्या दोन्ही सुकन्येनी राष्ट्रीय तायकंदो चॅम्पियन स्पर्धेमध्ये राष्ट्रस्तरावरील सुवर्णपदकाला गवसणी घालण्यात यशस्वी झाल्यात.

 

*बंजारा गोल्डन गर्ल* कु. श्रावणी झुंबर जाधव व तनुश्री झुंबर जाधव या दोन्ही सुकन्येनी प्रथम जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अन् आता राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक संपादन करून नव्या विक्रमांची नोंद केली.या दोन्ही सख्ख्या बहिणीने सुवर्ण अक्षरात नोंद करून ठेवण्यात येण्याजोगी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.त्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटुंबीयांसह बंजारा समाजाचे नाव राष्ट्र स्तरावर उज्वल केल्याबद्दल सर्व समाज बांधवान मध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.दोन्ही सख्ख्या बहिणीनीचे हे कार्य बंजारा समाजातील इतर खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणादायी नक्कीच ठरणारे आहे.
श्री.झुंबर भाऊ जाधव हे बेस्ट उपक्रमामध्ये बसवाहक पदावर कार्यरत आहेत.सौ.मनिषा झुंबर जाधव ह्या गृहिणी आहेत. दोन्ही जाधव दाम्पत्यांचे कष्ट वाकण्याजोग आहे. . कु. श्रावणी जाधव व तनुश्री जाधव यांचे प्रशिक्षकाच्या योग्य मार्गदर्शनामुळेच व त्यांच्या जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष प्रवृत्तीमुळेच जिल्हा, राज्य , राष्ट्रीयस्तरीय सुवर्णपदक मिळविले आहे.अन आता त्यांचा पुढील प्रवास आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सुरू होणार आहे.
परंतु आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जर या दोन्ही सुकन्येची निवड झाली तर त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हल्याकाची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरासाठी त्यांना एखादा दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, प्रतिष्ठान, सेवाभावी संस्थेची आर्थिक दृष्ट्यीने साथ मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
जाधव दाम्पत्याने या आनंदोत्सव उत्सवातील प्रवास सांगताना आनंद अश्रू नी अन् आजवर घेतलेल्या कष्टांमुळे त्यांचे डोळे पानावत होते.
राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवल्याबद्दल व आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा रुपी आशीर्वादांचा वर्षाव या दोन्ही सुकन्यावर होत आहे.
*ना बेटा हि घर का शान रहता है*!!
*बल्की बेटी ही घर की शान रहती है*!!
पुनश्च कु. श्रावणी जाधव व तनुश्री जाधव सह तीला प्रोत्साहन, प्रेरित करणाऱ्या सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो.
समाजातील सामाजिक संस्था,दानशूर व्यक्ती, यांनी नक्की आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या दोन्ही खेळाडूना आर्थिक सहयोग देऊन सहकार्य करावे. आपणास जाधव कुटुंबीयाच्या वतीने आवाहन करीत आहे.

धन्यवाद!!

!!न्युज रिपोर्टर!!

नितीन रमेश जाधव
आयडियल जर्नालिझम असोसिएशन
बदलापूर शहर

8108242832

 

‌‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed