रफी अहमद किडवाई पोलीस स्टेशन ची कामगिरी – चोरीस गेलेला पत्रकाराचा मोबाईल केला परत….

रफी अहमद किडवाई पोलीस स्टेशन ची कामगिरी – चोरीस गेलेला पत्रकाराचा मोबाईल केला परत….

मुंबई विशेष प्रतिनिधी (नितीन शिंदे) –

 

दैनिक जागरण चे यूपी आजमगढ मेहनगर चे पत्रकार दुर्गाप्रसाद सिंह हे महत्वाच्या कामासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये यूपी हुन मुंबई ला आले होते. शिवडी मध्ये त्यांचा विवो कंपनीचा जवळपास 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरी गेला होता. याची ऑनलाईन तक्रार त्यांनी उत्तर प्रदेश च्या ऑनलाईन पोर्टलवर केली होती. मुंबई पोलिसांनी याची दखल घेवून
पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरु केली व चोराच्या मुसक्या आवळून मोबाईल हस्तगत करून दि 10/1/2024 रोजी रफी अहमद किडवाई पोलीस स्टेशनच्या वतीने परत केला आहे.
दैनिक जागरण चे यूपी आजमगढ मेहनगर चे पत्रकार दुर्गाप्रसाद सिंह यांचा मोबाईल चोरी गेल्यावर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरु केली व पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी गोविंद खैरे, पोलीस हवालदार पाटे, पोलीस हवालदार श्री केकान पोलीस शिपाई श्री देशमुख, श्री आहेर, श्री राणे यांनी तपास करून मोबाईल हस्तगत केला. याची माहिती पत्रकार दुर्गाप्रसाद सिंह यांना दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले व चोरीस गेलेला मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले त्यांना एवढ्या लांबून यायला वेळ लागणार असल्याने त्यांचे मित्र व ऑल इंडिया पत्रकार संघटना आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन चे संयुक्त भारत प्रभारी अजयकुमार मिश्रा यांच्या कडे मोबाईल देण्याची विनंती केल्याने रफी अहमद किडवाई पोलीस स्टेशनच्या वतीने अजयकुमार मिश्रा यांना दि 10 जानेवारी रोजी मोबाईल देण्यात आला.
यावेळी पत्रकारांच्या वतीने पोलिसांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed