06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

पाचोरा भडगाव मतदार संघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा मेळावा संपन्न* 

0
IMG-20240421-WA0014

*पाचोरा भडगाव मतदार संघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा मेळावा संपन्न*

पाचोरा (प्रतिनिधी)-

*आबा सुर्यवंशी*

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा दिनांक २० शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री संजय वाघ यांच्या निवासस्थानासमोर संपन्न झाला. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संजय ओंकार वाघ यांच्या अध्यक्षतेत पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हा ओबीसी अध्यक्ष शालिग्राम मालकर जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख विधान क्षेत्र प्रमुख नितीन तावडे ,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, शहराध्यक्ष अझरखान, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची दैनावस्था कशी वाढली, कापूस सोयाबीन कांदा मका इत्यादी पिकांना भाव नाही, महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला हमीभाव नाही, शासकीय यंत्रणेचा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांचा दुरुपयोग कसा केला जात आहे . अनेक प्रश्नांच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले २०२४ होणारी लोकसभेची निवडणूक ही मोदींच्या हुकूमशाही बेरोजगारी जुमला विरुद्ध आहे. लोकसभेच्या होणाऱ्या या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपलं गाव आपलं बूथ काळजीपूर्वक सांभाळावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. संजय वाघ नितीन तावडे, शालिग्राम मालकर, भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील, भडगाव युवक अध्यक्ष कुणाल पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, बारकू पाटील ,धर्मा पाटील, पी.डी. भोसले, भागवत पाटील, मोहन पाटील, श्रीराम पाटील, अझर खान, आर एस पाटील, सतीश चौधरी, वासुदेव महाजन, अशोक मोरे, रणजीत पाटील ,धनराज पाटील, दिनेश पाटील सचिन पाटील खलील देशमुख, ललित वाघ, सोनू वाघ प्रदीप वाघ गजू अण्णा, बाळू आबा, झिपरू केदार, रेखाताई पाटील, रेखाताई देवरे ,सरलाताई पाटील, ज्योतीताई वाघ अभिजीत पवार पिंटू ,भामरे, रज्जाक भाई, योगेश महाजन, भुमा तात्या, श्याम भोसले, हेमराज पाटील, प्रकाश पाटील, शहर युवक अध्यक्ष उमेश एरंडे, विक्रांत पाटील, बाबाजी ठाकरे, जनार्दन पाटील, भालचंद्र ब्राह्मणे ,सत्यभामाताई अहिरे, प्रकाश वानखेडे, बी एस पाटील, शांताराम चौधरी, बाबाजी पाटील, योगेश पाटील, पंडित तेली, शितल पाटील, अशोक उबाळे, दत्तात्रय पाटील ,हारून देशमुख, शशिकांत चंदिले, रमेश शिरसाठ, आकाश कंखरे, योगेश महाजन, पाचोरा भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद राव पवार पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed