पाचोरा तावरे शाळेतील मुख्याध्यापक मारहाण प्रकरणाला वेगळे वळण*

*पाचोरा तावरे शाळेतील मुख्याध्यापक मारहाण प्रकरणाला वेगळे वळण*
———————————–
मुख्याध्यापकससेवा समाप्तीचे आदेश देण्यासाठी गेलेल्या *महिलेचा विनयभंग !*
वडिल व भावास मारहाण
-एका विरुध्द गुन्हा दाखल… पाचोरा (प्रतिनिधि)
*आबा सूर्यवंशी*
शहरातील आदर्श प्राथमिक विद्या मंदिरातील मुख्याध्यापकास सेवा समाप्तीचे पत्र देण्यास गेलेल्या डॉक्टर महिलेचा विनयभंग करत, वडिल व भावाला मारहाण केल्याची घटना २२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी महिला डॉक्टरच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात “त्या” एका विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, नरेंद्र शंकर जोशी (वय – ५४ वर्ष) रा. विवेकानंद नगर, पाचोरा हे येथील आदर्श प्राथमिक विद्या मंदिरात मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. मात्र नुतन महिला सर्वोदय बाल विकास संस्था, पाचोरा जा. क्रं. १३१ / नु. म. प्रा. शा. / २०२३ – २०२४ दि. २० एप्रिल २०२४ अन्वये आदर्श प्राथमिक विद्या मंदिरातील मुख्याध्यापक नरेंद्र शंकर जोशी यांची दि. २२ एप्रिल २०२४ पासुन सेवा समाप्त झाली असल्याचे पत्र २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास डॉ. अनुजा प्रतापराव तावरे ह्या गेल्या असता नरेंद्र जोशी यांना त्याचा राग आल्याने नरेंद्र जोशी यांनी डॉ. अनुजा तावरे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच डॉ. अनुजा तावरे यांचे वडिल निवृत्त प्रा. प्रतापराव तावरे व भाऊ डॉ. रोहीत तावरे हे घटनास्थळी येवुन वाद मिटवत असतांनाच नरेंद्र जोशी यांनी डॉ. रोहीत तावरे यांच्या उजव्या कानाचा चावा घेतला. तसेच प्रा. प्रतापराव तावरे यांना देखील शिविगाळ करत चापटाबुक्यांनी मारहाण केली. डॉ. रोहीत तावरे यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर शाळेचा घंटा मारुन जखमी केले. डॉ. अनुजा तावरे यांच्या फिर्यादीवरून नरेंद्र शंकर जोशी यांचे विरुध्द पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे हे करीत आहे.————-
*नेमके काय ? आहे प्रकरण ?*
दलितमित्र सह अनेक पुरस्कार प्राप्त, तथा गत काळातील ज्येष्ठ समाजसेविका ,माजी नगरसेविका सौ. निर्मलाताई तावरे यांनी सर्वोदय महिला बाल विकास संस्थेची स्थापना केली होती. त्या हयात असे पर्यंत या शिक्षण संस्थेने शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावून शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळविला होता. मात्र त्यांच्या हृदयविकाराच्या अकाली निधनाने ही संस्था त्यांचे दत्तकपुत्र यांची पत्नी स्व. तावरे बाईंची एक मुलगी यांच्यात संस्था ताब्यात घेण्याची चढाओढ बरेच वर्षे कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. अनेक वर्षे हा खटला चालला. सुदोपसंधी झाल्या नंतर आणि कायदेशीर कटकटीतून ही शिक्षण संस्था बाहेर पडल्या नंतर काही कालावधी गेल्या नंतर या संस्थेचे काही अत्यंत विश्वासपात्र ? कर्मचाऱ्यांनी संस्था अध्यक्षा यांच्या बेमालूमरित्या योजनांबद्ध स्वाक्षऱ्या घेवून ही शैक्षणीक संस्था बळकवल्याचा आरोप, एकमेकांविरोधात तक्रारी नाट्यमय घडामोडी आणि वादविवाद पोलिसात आणि न्यायालयीन पक्रियेत आहे. या संस्थेवर अध्यक्षा, संचालक मालकीचे दावे – प्रतिदावे सुरू असून त्याचाच एक हा भाग असल्याच्या चर्चा आहे.?