सन्मा. श्री. अरविंद गणपत सावंत यांच्या प्रचारार्थकाढलेल्या प्रचारफेरीस उदंड प्रतिसाद…

रिपोर्टर आनंद केळशिकर मुंबई
आइडियल इंडिया न्यूज़
वरळी विधानसभा शाखा १९८/१९९ भागात ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी । INDIA Alliance मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्मा. श्री. अरविंद गणपत सावंत यांच्या प्रचारार्थकाढलेल्या प्रचारफेरीस उदंड प्रतिसाद… ठिकठिकाणी माताभगिनींनी औक्षण करुन शुभेच्छा दिल्या, स्थानिक नागरिक, छोटे मोठे व्यावसायिक, दुकानदार तसेच मंडळांच्या पदाधिकार्यांनी पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत केले आणि समर्थन दर्शविले. प्रचारफेरी मार्गावर भेटणारे नागरिक आवर्जुन प्रचारफेरीत देखील सहभागी होत होते.
अरविंद सावंत यांनी आपली निशाणी ‘मशाल’ असल्याचे सांगुन सर्वांनी मतदानाचा पवित्र अधिकार बजावुन अधिकाधिक
मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले.
यासमयी माझ्यासोबत आमदार, उपनेते श्री. सचिन आहीर, आमदार श्री. सुनील शिंदे तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे आजी – माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
#ArvindSawant #आपलामाणूस #दक्षिणमुंबई #LokSabhaElections2024 #मशाल