श्री गो. से. हायस्कूलचे ९० माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी तब्बल ३५ वर्षांनी आले एकत्र*

*श्री गो. से. हायस्कूलचे ९० माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी तब्बल ३५ वर्षांनी आले एकत्र*
दोन दिवसीय स्नेह संमेलनात आठवणीं दिला उजाळा
रिपोर्टर – आबासाहेब सुर्यवंशी
पाचोरा तालक्यातील आणि जिल्ह्यात नामांकित असलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. गो.से. हायस्कूलचे सन १९९० च्या इयत्ता १० वी बॅचचे ९० माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी सवंगड्याना तब्बल ३५ वर्षानी एकत्र आणण्याचे काम माजी विद्यार्थ्यांनी केले. तसेच सर्वांना एकत्र आणून विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देत भडगांव रोडवरील वरील स्वप्नशिल्प बॅकवेट हॉल मध्ये दि.१८ आणि १९ मे रोजी दोन दिवसीय स्नेह मेळावा आयोजित केला होता. विविध शहरात व्यावसायिक, नोकरीत कार्यरत आणि स्थाईक असलेल्या माजी विद्यार्थी, आणि विद्यार्थिनींनी माहेर सोडून सासरी आपापल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आपल्या वाढत्या वयाच्या उंबरठयावर वाटचाल करतांना दोन दिवसाच्या स्नेह संमेलनात उपस्थित राहण्यासाठी वेळ काढून जीवनातील व गतकाळात शालेय जीवनात एकमेकां सोबत घालवलेल्या क्षणांना पुन्हा एकत्र येवून आठवणींच्या शिदोरीची देवाण घेवाण करतांना भाऊक झाले होते.
दोन दिवसीय स्नेसंमेलनाचे उद्घाटन श्री.गो.से.हायस्कूलचे माजी ज्येष्ठ शिक्षक स.गो.जोशी सर यांच्या हस्ते तर संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या प्रमुखउपस्थितीत करण्यात आले.
पहिल्या दिवशी दि. १८मे रोजी स्वप्नशिल्प हॉल येथे सर्व माजी मित्रांनी एकमेकां चा ओळख परिचय करून घेतला. अणि या प्रसंगी सर्वांनी विविध खेळ खेळत, गाणी गात, भारुड नच गाण्याचा आनंद घेतला आणि सर्वांना स्मृतीचिन्ह देण्यात आली. दि. २९ मे रोजी सर्वांनी शाळेला भेट दिली या वेळी रंगकाम साहित्य अर्पण केले. सर्व ९० सवंगड्यानी पूर्ण शाळा बघण्याचा ,आपल्या वर्गात बेंच वर बसले.आणि आपल्या माजी गुरुजनां सोबत फोटो काढले.
त्यानंतर स्वप्नंशिल्प हॉल येथे छोटेखानी सहयोग-ध्यान योग सत्र सौ.मनिषा गोस्वामी यांच्यातर्फे घेण्यात आले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्याकरिता प्रमुख आयोजक माजी नगरसेवक तथा रजतोरण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप शांताराम पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, ऍड. भैय्यासाहेब देशमुख, अविनाश देशमुख, रणजित पाटील, पप्पू राजपूत, सुबोध कांतयन,गिरीश सनांसे, किशोर पाटील,रवींद्र पाटील महेश वाघ, संगीता पाटील , रुपाली कासोदेकर, मनीषा बावा, सकिना भरमालआनंद शर्मा, ऍड. सचिन काटकर, नाशिक उप आयुक्त राजेंद्र मधुकर पाटील, रितेश ललवाणी, धीरज प्रजापत आदींनी परिश्रम घेतले.