चंद्रयान-३” सफल प्रक्षेपणानंतर बदलापूर मधील नाईक विद्यालयाने साजरा केला “राष्ट्रीय अवकाश विज्ञान उत्सव “

“चंद्रयान-३” सफल प्रक्षेपणानंतर बदलापूर मधील नाईक विद्यालयाने साजरा केला “राष्ट्रीय अवकाश विज्ञान उत्सव ”

आइडियल इंडिया न्यूज़

बाला साहेब पाटिल थाना महाराष्ट्र

“आदर्श शिक्षक ” म्हणून राष्ट्रपति पुरस्काराने सन्मानित मुख्याध्यापक श्री.विश्वनाथ पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली व विज्ञान शिक्षक यांच्या प्रेरणेतून आज चंद्रयान-३ प्रक्षेपणाची विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्काऊट,गाईड, शास्त्रज्ञ अशा प्रेरणादायी वेशभूषेत चंद्रयानाची प्रतिकृती सह आज एक वैशिष्ट्यपूर्ण, राष्ट्रीय अवकाश विज्ञान उत्सव साजरा केला.

 

या अप्रतिम कार्यक्रम प्रसंगी सहभागी राष्ट्रपतींच्या “आदर्श शिक्षक ” म्हणून पुरस्काराने सन्मानित असे मुख्याध्यापक श्री.विश्वनाथ पाटील सर, सर्व शिक्षक वृंद यांच्या या राष्ट्रीय बाणा व राष्ट्रभक्ती ची बिज रोवणाऱ्या कृतीशील देशभक्त विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.

 

आयडियल जनरलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र चे श्री बाळासाहेब पाटील (प्रवक्ता महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हाध्यक्ष),बदलापूर शहराध्यक्ष श्री लक्ष्मण कोळी, श्री विशाल सावंत बदलापूर अंबरनाथ शहराध्यक्ष, श्री अभिजीत सुर्वे सचिव ठाणे जिल्हा, श्री विश्वास दादा माने , श्रीमती रेश्मा ताई सुर्वे बदलापूर शहर अध्यक्ष

(महिला विभाग ), श्री जितू पटोळे अंबरनाथ शहर अध्यक्ष शंकर राठोड व श्री नितीन जाधव या सर्व मान्यवरांतर्फे राष्ट्रपती पुरस्कृत प्राध्यापक श्री विश्वनाथ पाटील सर, सर्व अधिकारी आणि विद्यार्थी यांना अभिनंदन व भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed