06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

ट्रिपल महाराष्ट्र केसरी ACP विजय चौधरी कॅनडा देशाच्या आखाड्यात दाखवणार जलवा

0
IMG-20230719-WA0264

ट्रिपल महाराष्ट्र केसरी ACP विजय चौधरी कॅनडा देशाच्या आखाड्यात दाखवणार जलवा

नवी मुंबई से भरत कुमार भानूशाली की रिपोर्ट

तीनदा महाराष्ट्र केसरी पुरस्कारावर आपली मोहर उमटवणारे पुण्यात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी हे कॅनडामध्ये होणाऱ्या ‘वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स’ स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा २८ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या स्पर्धेसाठी पै. विजय चौधरी यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटर वरून शुभेच्छा दिल्या आहेत.

चौधरी यांनी २०१४,२०१५ आणि २०१६ अशा सलग तीन वर्षामध्ये अतिशय प्रतिष्ठित अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सायगाव बगळीचे रहिवासी असलेले चौधरी हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा पुणे विभागात येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आगामी पोलीस खेळांमध्ये ते १२५ किलो वजन गटात खेळणार असून, हिंद केसरी पै .रोहित पटेल यांच्याकडून ते कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. आता कॅनडामध्ये तिरंगा फडकावण्याचे ध्येय उराशी बाळगून चौधरी हे कॅनडाला रवाना होतील.

स्पर्धेच्या तयारीबाबत चौधरी म्हणाले, आगामी स्पर्धेत कॅनडा, रशिया, अमेरिका, चीन या देशांच्या कुस्तीपटूंचे भारताला मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी मी प्रशिक्षणावर अधिक भर देत आहे. या प्रशिक्षणासाठी मला महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात कॅनाडियन टाईम झोननुसार माझे सध्याच्या घडीला प्रशिक्षण सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed