दिनांक 1 ऑगस्ट2023 रोजी दोन्ही नवीन संस्थांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते
राहुल शांताराम दाहोत्रे की रिपोर्ट
पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी मधील 9 मार्च 1957 रोजी स्थापना झालेली सहकारातील महाराष्ट्रातील आदर्शवत अशी कामगार पतपेढी ही तब्बल 67 वर्षानंतर एकत्रित रित्या काम करून विभाजन होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदी वातावरणात पुढील कामकाज करण्यास सज्ज झालेली आहे
दिनांक1 ऑगस्ट 2023 रोजी 4 लिमिटेड कंपनी एकत्रित रित्या संघटित होऊन सहकार क्षेत्रातील दुर्मिळातील दुर्मिळ असे उदाहरण म्हणून संबोधले तरी वावगे होणार नाही ही संस्था दोन वेगवेगळ्या नवीन संस्थेमध्ये विभागली गेली तसे आदेश श्री नागनाथ कंजारी उपनिबंधक पुणे शहर 3 यांनी दिनांक 17 /7/2023 च्या आदेशान्वये दिलेले होते,
त्याकरता मुख्य प्रवर्तक म्हणून श्री शिवराज शिंदे यांनी सर्व कामकाज पाहिले दिनांक 1 ऑगस्ट2023 रोजी दोन्ही नवीन संस्थांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रिमियम ट्रान्समिशन प्रा लिमिटेड कंपनीचे सीईओ श्री राघवेंद्र जी किनीसाहेब ,
ग्रुप सी एच आर ओ निशाजी सकारियामॅडम, महेश रंगोली साहेब( प्लांट हेड) तसेच ग्रीव्हज कंपनी मधून श्री अविनाश शिनकर जनरल मॅनेजर आणि त्यांचे सहकारी व सर्व कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि तीनही कंपनीतील संस्थेचे सर्व सभासद उपस्थित राहून अतिशय आनंदी वातावरणात पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी श्री किनी साहेब तसेच निशाजी सकारिया मॅडम यांनी संस्थेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सर्व सभासदांना हमी दिली आणि संस्था हिताबरोबर सभासद हित जोपासावे अशी ही सूचना केली,
विषय पत्रिकेनुसार सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले उपस्थितअसणाऱ्या प्रमुख अतिथी यांचे मुख्य प्रवर्तक म्हणून श्री शिवराज शिंदे यांचे तर्फे सन्मान करण्यात आला यासाठी नवीन अकरा जणांचे नवनियुक्त संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले आणि पहिली सर्वसाधारण सभा ही संपन्न झाली सभेसाठी लेखा परीक्षक म्हणून श्री किशोर जाधव यांचे मार्गदर्शन झाले याचवेळी सहकार भारती चे कोशाध्यक्ष श्री औदुंबर नाईक यांनी सर्व उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले संस्थेचा ताळेबंद संस्थेच्या व्यवस्थापक सौ तोडकरमॅडम यांनी वाचन केला आणि सभेचे आभार प्रदर्शनाचे कामकाज श्री जयंत हर्षे डीजीएम एचआर अँड आय आर यांनी केले.