लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*
*लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*
थाने महाराष्ट्र से नितिन शिंदे की रिपोर्ट
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे प्रतिष्ठाण मानखुर्द च्या वतीने आण्णा भाऊ साठे यांची जयंती मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे मोठ्या जोशात पार पडली.
महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी महाराष्ट्र नगर मधील बहुसंख्य महिला वर्ग तसेच नागरिक उपस्थित होते.प्रसिद्ध शाहीर प्रकाश साठे यांनी शाहीर साबळे, बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची गौरव गिते तसेच पोवाडे गाऊन उपस्थित नागरिकांना त्यांच्या कर्तृत्वाची आठवण करून दिली. उपस्थित नागरिकांनी सुद्धा त्यांना तितकीच दिलखुलास दाद दिली .’माझी मैना गावाकडं राहिली’या आण्णा भाऊ साठे यांच्या छक्कड ने उपस्थितांना मंत्रमुघद्ध केले.
जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शाहीर आण्णा भाऊ साठे यांना नमन केले.
यावेळी समाजातील गुणवंताना शालेय साहित्य देऊन गौवरण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते श्री प्रमोद शिंदे, सतीश काळगावकर, किरण सावंत, हरणाई ज्वेलर्स चे मगरशेठ, प्रगती मित्र मंडळाचे कार्यकर्ते, तसेच दत्ता गायकवाड, विठ्ठल मोरे, मारुती देसाई सर, मांगले सर, मातंग समाजाच्या नेत्या कुसुम ताई,अखिल भारतीय मातंग सेनेचे अध्यक्ष योगेश शिंदे, समाजाचे मार्गदर्शक गायकवाड त्याच बरोबर ट्रॉम्बे पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे प्रतिष्ठाण चे अध्यक्ष मारुती भिसे तसेच कार्याध्यक्ष चंद्रकांत कमाने साहेब यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम मोठया उत्सहात तसेच जल्लोषात पार पडला. तसेच संस्थेचे सचिव आनंदा कमाने उपाध्यक्ष यशवंत खरात खजिनदार महादेव खंडागळे सदस्य लाला सिंग वैराट यांचबरोबर इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत कमाने यांनी आणा भाऊ साठे यांनी केलेल्या लेखणा प्रमाणे आजची राजकीय परिस्थिती देशात घडत आहे असं नमूद केलं आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावला त्यांचे आभार मानले.