*डोळखांबमध्ये पार पडला आदरणीय श्री.किसनजी कथोरे साहेबांचा जनता दरबार*

*डोळखांबमध्ये पार पडला आदरणीय श्री.किसनजी कथोरे साहेबांचा जनता दरबार*

रिपोर्ट – कैलाश पाटिल वाडा थाने महाराष्ट्र

*माँ साहेब जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माझ्या शहापूर तालुक्यातील आजोबा पर्वताच्या कुशीत वसलेल्या माझ्या डोळखांब नगरीत पांडुरंगाच्या रुपात विठ्ठलाचं दर्शन साक्षात त्यांच्या भक्तांना,विकासकामाच्या माध्यमातून त्यांच्या जनतेला मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री.किसनजी कथोरे साहेब यांच्या रूपाने पहावयास मिळालं.*

*आज मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री.किसनजी कथोरे साहेब यांची विकासपुरुष म्हणून ओळख आज संबंध महाराष्ट्राला आहे म्हणूनच आज त्यांचा उल्लेख करतांना केवल मुरबाड विधानसभेचे आमदारच नव्हे तर महाराष्ट्राचे आमदार म्हणून करतात आणि का करू नये,ज्या व्यक्तीने कधी समोर येणाऱ्या माणसाची जात,त्याचा पंथ आणि त्यांचा धर्म न पाहता त्यांच्या सढळ हाताने मदत केली असे गोरगरीब जनतेचे महामेरू म्हणजे आदरणीय आप्पासाहेब.ज्यांच्याकडे कोणतीही समस्या घेऊन गेले असता त्या समस्येचे निवारण झाले नाही असे कधी झालेच नाही,त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांची त्यांनी केव्हा जात,पात आणि धर्म विचारला नाही की कोणत्या पक्षाचा आहे हे विचारलं नाही असा एकमेव नेता म्हणजे आदरणीय श्री.आप्पासाहेब*.

*साहेबांची सगळ्यात मोठी विशेषतः आज मला आवर्जून सांगावीशी वाटते की,मुरबाड तालुक्याबरोबरच शहापूर तालुक्यावर त्यांचं असणार नितांत प्रेम,शहापूरच्या विकासासाठी सदैव तत्परता ह्याच गोष्टी जनतेच्या मनात घर करून बसतात.

 

*आमदार आपल्या भेटीला* या कार्यसम्राट आमदार

मा.श्री.किसनजी कथोरे साहेबांच्या

शहापुर तालुक्यातील डोळखांब विभागाचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

डोळखांब येथील कुणबी समाज हॉल येथे आमदार साहेबांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी डोळखांब आणि परिसरातील गाव,वाड्या,वस्तीतील अनेक नागरिकांनी,ग्रामपंचायतींनी आपल्या विविध समस्या,विकासकामे करण्याबाबतची निवेदने आमदार साहेबांना दिली यावेळी साहेबांनी त्यांच्या समस्यांचा निवारण लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले,त्याचप्रमाणे

साहेबांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहापुर,डोळखांब तसेच परिसरातील विकासकामांबाबत आलेल्या निवेदनांवर भाष्य करतांना गावांना जोडणारे रस्ते,जलजीवन योजना,विद्युत ट्रान्सफॉर्मर,बस सुविधा,पोल बदलणे,व्यायामशाळा बांधणे,व्यायामशाळा साहित्य देणे आदि समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढून प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जातील तसेच

पौराणिक काळाचा संदर्भ असलेला अजा पर्वत आणि इतर काही तीर्थस्थळांचा विकास करून पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच कृती आराखडा तयार करण्यात येईल.त्याचप्रमाणे डोळखांब विभागात बहुद्देशीय प्रकल्प आणणार आणि त्यांच्या माध्यमातून रोजगार वाढीस चालना देणार हेही आमदार साहेबांनी आवर्जून सांगितले.

यावेळी या मेळाव्यात शहापुर,डोळखांब आणि परिसरातील अनेक पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,सरपंच,उपसरपंच,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाच वातावरण पहावयास मिळालं, जाता जाता साहेबांच्या तोंडून निघालेलं एक उद्गार शहापूर च्या विकासाला चालना देणार आणि शहापूरचा नकाशा बदलणार.

 

शेवटी शेवटी डोळखांब व परिसरातील जनतेने साहेबांचे विशेष आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed