माहेर प्रतिष्ठान यांच्या वतीने गुणवंतांचा सन्मान
*माहेर प्रतिष्ठान यांच्या वतीने गुणवंतांचा सन्मान*-
आइडियल इंडिया न्यूज़
शिवाजी कांबळे अणदूर
– जवाहर विद्यालय, अणदूर येथे आज(29 नोंव्हेबर)रोजी जवाहर विद्यालयाच्या माजी विद्यार्थींनी आणि अणदूर येथील माहेरवाशीण यांच्या वतीने गुणवंत,हुशार व गरजू चौदा विद्यार्थींनींना प्रत्येक आठ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिक्षणमहर्षी,संस्थेचे शिल्पकार स्वर्गीय सि.ना.आलुरे गुरूजी व कै.शांताकाकी आलुरे यांच्या प्रतिमांचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.उषाताई महादेव आलुरे,माहेर प्रतिष्ठानच्या सर्व महिला सदस्यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती ज्योती चौधरी मॅडम यांनी केले.माहेर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती नीता गुळवणी मॅडम आणि सचिव श्रीमती प्रज्ञा कुलकर्णी मॅडम यांनी शिक्षणमहर्षी आलुरे गुरूजी आणि स्वर्गीय शांताकाकींच्या संस्कारामुळेच घडलो,जवाहरचे संस्कार आजही आम्ही आमच्या आयुष्यात जगत आहोत,आज आम्ही जीवनात सुस्थिर आहोत पण गुरूजींनी घालून दिलेला वसा आणि वारसा या दातृत्वातून पुर्ण करत आहोत,माणसाने समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपावी,ज्या समाजात आपण वावरतो,उत्तम संस्कार घेतो त्या समाजाला संस्काराला विसरू नये,गुरूजींनी व काकींनी आम्हाला उत्तम संस्कार,ज्ञानाची शिदोरी दिली,ती आम्हाला ह्या जन्मात पुरेल एवढी आहे,पण आम्ही त्या शिदोरीतील काही अंश समाजाला देऊ करत आहोत,
त्याचाच हा छोटासा प्रयत्न आहे अशा भावना व्यक्त केल्या.. यावेळी विद्यालयाच्या वतीने त्यांचा खण,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.. माहेर प्रतिष्ठानच्या वतीने कुमारी नेहा कंदले,श्रध्दा कदम, प्राजक्ता होनाजे,सिध्दी मोहराळे,समीक्षा गायकवाड,जोया आत्तार,नम्रता नंदीगौडा,दिशा सलगर,शाश्वती बंडगर,सिमरन फकीर,शिवानी घुगे,समीक्षा कांबळे,दिक्षा लंगडे,स्नेहल जाधव आर्थिक मदत व शांताई गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.. अध्यक्षीय समारोपात सौ.उषाबाई आलुरे यांनी संस्थेचे शिल्पकार सि.ना.आलुरे गुरूजी व शांताकाकींच्या कार्याला जड अंतःकरणाने उजाळा दिला, गुरूजींचे हे पवित्र काम पुढे असेच प्रामाणिकपणे चालू ठेवा,पुर्वीचा काळ,परिस्थितीची सांगड घालत हा कार्यक्रम प्रेरणादायी आहे, गुरूजींचे कार्य यातूनच दिसते अशा भावना व्यक्त केल्या..यावेळी जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.उमाकांत चनशेट्टी सर, उपमुख्याध्यापक श्री.सुरेश ठोंबरे सर,उपमुख्याध्यापक श्री.गोपाळ कुलकर्णी सर,माजी प्राचार्या डॉ.अनिता मुदकण्णा मॅडम,सेवानिवृत्त श्री.शशिकांत मोहराळे गुरूजी, प्रतिष्ठित नागरिक श्री.अरविंद आलुरे श्री.आसमंत पाटील,श्री.प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. माहेर प्रतिष्ठानच्या श्रीमती मीना पाटील,सुरेखा काळे,विद्या विभुते,भावना जोशी,म्हाळसा कदम,मंजू बिराजदार,प्रतिभा कंदले,राजेश्री कबाडे,आरती पाटील,शैला बिराजदार,लक्ष्मी पाटील,रागिणी आपशेट्टी,सुनिता ढेपे,इंदूमती ढोणी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.यावेळी श्रीमती नरसाबाई पाटील,संजीवनी आलुरे,अरूणा आलुरे,उषा आलुरे,शकुंतला ढेपे,ज्योती कुलकर्णी,ज्योती डोंगरे,मनू अणदूरकर,शामा कुलकर्णी,मिरा देवशिंगकर इत्यादी उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती क्रांती अंधारे मॅडम यांनी तर आभार श्री.कुलकर्णी सर यांनी मानले शेवटी खरा तो एकचि धर्म या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.