05/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चे स्नेहसंमेलन उज्वलेश्वर उद्यान उज्वल कॉलनीत उत्साहात

0
IMG-20240220-WA0362

भड़गांव महाराष्ट्र से सुरेश पाटिल की रिपोर्ट

*रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चे स्नेहसंमेलन उज्वलेश्वर उद्यान उज्वल कॉलनीत उत्साहात*

17 फेब्रुवारी 2024 रोजी रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्नेहसंमेलन साजरा झाले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मुख्याधिकारी सो लांडे साहेब माननीय राजेश काळे समर्थ फाउंडेशन पाचोरा माननीय हरिभाऊ पाटील बल्लाळेश्वर फाउंडेशन पाचोरा माननीय विजयकुमार रायभान भोसले जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना ताई साहेब द्वारकाबाई सोनवणे माजी नगरसेविका पाचोरा ताईसाहेब माया मॅडम भोसले सु.गी .पाटील विद्यालय संदीप पाटील अण्णासाहेब नथू पाटील पाचोरा रंगराव पाटील रिटायर्ड पीएसआय भडगाव सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती व नटराजन मूर्ती यांचे पुष्पहार घालून वरील मान्यवरांनी केले त्यानंतर स्वागत गीत आकांक्षा पाटील तिने गायले त्यानंतर सर्वप्रथम *प्रार्थना माणसाने माणसाशी माणसासम वागले पाहिजे शाळेच्या लहान चिमुकल्यांनी गायले*

 

या कार्यक्रमात विविध कलागुणांना वाव देण्यात आला यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप डान्स वैयक्तिक डान्स मुक अभिनय फॅन्सी ड्रेस इत्यादी गोष्टींचा सहभाग होता यात *ज्ञानेश्वर माऊलींचा फॅन्सी ड्रेस तसेच पृथ्वी होऊनम देणारा संदेश छत्रपती शिवाजी महाराज आईसाहेब जिजाऊ सावित्रीबाई फुले गुरखा तसेच राम आयेंगे या गाण्यातून प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीताच्या रूपात आणि हनुमान रुपात लहान मुलांची वेशभूषा आकर्षण ठरली* तसेच या कार्यक्रमात *डान्स व मूक अभिनय एकात्मतेचे प्रतीक आणि लाकूडतोड्याची गोष्ट ही देखील कार्यक्रमाची एक आकर्षणीय बाब ठरली* यामध्ये कॉलनी परिसरातील ज्येष्ठ लहान थोर मंडळींनी खूप उत्साह दाखवून आनंद घेतला व मुलांना प्रेरणा दिली या कार्यक्रमात पालकांचा देखील सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर होता माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या मनोगतातून या अशा लहान मुलांना प्रेरणा देण्यासाठी मला खूप आवडते व आनंदही मिळतो ज्या वयात आम्ही काही केले नाही त्या मानाने ही मुलं भरपूर काही करीत आहेत व खास मुख्याधिकारी साहेब पहिल्यापासून ते शेवटी राष्ट्रगीता पर्यंत थांबलेत ही कॉलनी वासियांसाठी व आमच्या शाळेसाठी एक लक्षणीय बाब ठरली तसेच विजयकुमार भोसले यांनी यांच्या मनोगत मध्ये आमच्या कॉलनीतील या गार्डनचा हा पहिलाच कार्यक्रम व त्यात अतिसुंदर सुरुवात आमच्या या उज्वलेश्वर उद्यानाच्या माध्यमातून झाली यातून आम्ही साकारलेली उद्यानाची संकल्पना फलदायी ठरली असे म्हटले व शेवटपर्यंत वेळ देऊन सहपरिवाराने आनंद घेतला अध्यक्ष भाषणात प्राध्यापक राकेश सोनवणे लहान मुलांना सहज व आनंद शिक्षण देणे ही काळाची गरज आहे त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम परंतु या कार्यक्रमासाठी शाळा व पालकांचे समन्वय महत्त्वाचे असते आणि आम्हाला तो समन्वय पालकांच्या माध्यमातून मिळतो आणि आमची मेहनत फळाला येते हे म्हटले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रतिभा राकेश सोनवणे यांनी मांडले तर सूत्रसंचालन मीना पाटील मॅडम प्रिया अहिरे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार गायत्री नेवरे मॅडम यांनी करून शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली कार्यक्रमाचे साठी अनमोल सहकार्य ज्योती महाजन केअरटेकर आकांक्षा पाटील नीरज खैरनार नितीन पाटील शुभम भोसले आकाश बागल सौरभ भोसले राजन भोसले रुपेश पाटील सार्थक सोनवणे अनुज महाजन राम महाजन संजय पाटील राज पाटील गुंजन बागल शुभम कोळी योगेश थोरात मुकेश सोनवणे कल्पेश पुजारी व संपूर्ण उज्वल कॉलनी परिवार यांचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed