आर्थिक मदतसह एकुण जमा झालेली रू.३३,३००/- चा धनादेश, श्री गौरव पाटील यांच्या मातोश्री सौ.निताताई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

आइडियल इंडिया न्यूज़
बालासाहेब लुबान पाटिल
जळगाव जवळील मौजे कुसुंबा येथील रहिवासी श्री गौरव पाटील यांचा भडगाव येथे रस्ता प्रवासात वाहन अपघात होऊन जबर जखमी झाले होते.त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटल परेल, मुंबई येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.आणि हॉस्पिटल औषधोपचार खर्च जवळपास काही लाखांवर गेल्याने त्यांच्या मातोश्री सौ.निताणताई यांनी आर्थिक मदीचा हात आपल्या महाराणा क्षत्रिय राजपूत समाज सेवाभावी संस्थेंकडे आव्हान केले होते.
संस्थेने त्यांनी केलेल्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाथ देत संस्थेच्या वतीने समाज बांधवांना फुल नाही फुलाची पाकळी असे ऐच्छिक आर्थिक मदतीचे आव्हान समाज बांधवांना केले.त्यानुसार दानशूर समाज बांधवांमार्फत यथाशक्ती खासकरून संस्थेचे सन्माननीय भिवंडी विभाग प्रमुख सन्माननीय श्रीमान योगेशदादा राजपूत यांनी रू.११,०००/- हजार रूपयांची नेहमी प्रमाणे भरीव सढळ हाताने आर्थिक मदतसह एकुण जमा झालेली रू.३३,३००/- चा धनादेश आज दिनांक ८/४/२०२४ रोजी श्री गौरव पाटील यांच्या मातोश्री सौ.निताताई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री माधवराव पाटील,अध्यक्ष श्री संजयसिंग राजपूत,उपाध्यक्ष श्री दिलीप पाटील,खजिनदार श्री विजयसिंग पाटील,सहखजिनदार श्री भुपेन्द्रसिंग राजपूत, सन्माननीय सदस्य श्री रामसिंग राजपूत आणि मुंबईतील प्रसिद्ध पत्रकार श्री बाळू पाटील व इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.