06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

पाचोरा ग्रामीण रुग्णालय सावळागोंधळ प्रकरण *दोषी डॉक्टर – कर्मचारी चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठविणार

0
Screenshot_20230418_191659_All Document Reader

पाचोरा ग्रामीण रुग्णालय सावळागोंधळ प्रकरण

*दोषी डॉक्टर – कर्मचारी चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठविणार !*

डॉ. टाक, वैद्यकिय अधीक्षक

आइडियल इंडिया न्यूज़

पाचोरा (प्रतिनीधी)—पाचोरा ग्रामिण रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेला वेळेवर योग्य उपचार आणि रुग्णवाहिका उपब्धत नंक्रून देता खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देणारे डॉक्टर नर्सेस v कर्मचारी यांच्या वागणुकीचा विपरीत परिणाम त्या महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला सोसावा लागला. हे प्रकरण चागलेच गाजल्याने आणि पीडित महिलेच्या पतीने वरीष्ठ स्तरावर तक्रारी केल्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालय चर्चेत आहे या प्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.टाक यांनी प्रतिक्रियेत सांगितले की, मी १७ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधी दरम्यान रजेवर असल्याने झालेला प्रकारची मला पूर्ण माहिती नाही. रुग्णालयात जर कर्तव्यात कसूर होत असेल आणि रुग्णांना त्याचा त्रास होत असेल तर याला कारणीभूत डॉकटर, नर्सेस, कर्मचारी याची चौकशी केली जाईल. मी रजेवर जाण्यापूर्वी माझ्या पश्चात ग्रामिण रूग्णालयाची संपुर्ण जबाबदारीही डाॅ.अमित साळुंखे यांची होती.२३ एप्रिलला रूग्णालयात स्ञीरोगतज्ञ डाॅ.विजय पाटील, नर्स स्नेहल उगरे, ब्रदर रमेश सांगळे व वार्ड बाॅय अमोल मापारी आदी ड्यूटी वर होते. तर१०२ रूग्णवाहीकेचा चालक शरद कोळी हा १० दिवसांच्या रजेवर आहे. सदर महीला ग्रामिण रूग्णालयात दाखल झाल्यावर कार्यालय प्रमुख, तज्ञ डाॅक्टर आणी नर्स यांनी समन्वय साधुन “त्या” महीलेला योग्य उपचार देणे अपेक्षित होते. रूग्णवाहीकेचा चालक रजेवर गेला होता तर तत्काळ सेवेसाठी पर्यायी व्यवस्था डाॅ. अमित साळुंखे यांनी करणे अपेक्षित होते.या प्रकरणाशी संबंधित सर्वांना तक्रारी अर्जानुसार मेमो देउन त्यांचा लेखी खुलासा घेउन तक्रारदार यांचे म्हणणे जाणुन घेणार आहे.या प्रकरणाची चौकशी करून अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविनार आहे.

*डॉ.सतिष टाक*

वैद्यकिय अधीक्षक, पाचोरा ग्रामीण रुग्णालय,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed