06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेच्या जीवाशी खेळ*

0
Picsart_24-03-22_23-05-34-209

*पाचोरा ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेच्या जीवाशी खेळ*

वेळेवर उपचार करण्यास नकार ; खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला

पाचोरा (प्रतिनीधी)- सोयगाव तालुक्यातील विशाल निकान यांच्या २५ वर्षीय पत्नी अंकीता निकम रा. पोहरी ही गर्भवती होती. तिचे प्रसूतीचे दिवस पुर्ण झाल्यानंतर दि.२३ एप्रील रोजी तिच्या पोटात प्रसुतीकळा सुरु झाल्याने त्या पती सह ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे सायंकाळी ५ प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. सुरुवातीला रुग्णालयात ड्युटीवर असलेले डॉक्टर व महिला कर्मचारी यांनी बाळांतपण होवून जाईल असे सांगत बाहेरुन औषध आणण्यास सांगीतले. मात्र रात्री १० च्या सुमारास तिला त्रास जाणवला. गर्भातून बाळाचे डोके बाहेर आले असता डॉक्टर व नर्सेस म्हणाले की,येथे बाळातंपण येथे होणार नाही तुम्ही खाजगी दवाखान्यात घेवून जा असे अचानक सांगीतले. पतीने रुग्णवाहिका मागीतली असता ती उपलब्ध करून दिली नाही. रिक्षा मागवुन एका खाजगी हॉस्पीटल येथे घेवून गेलो. त्यांनी तिला तपासून जळगांव जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी माझ्या पत्नीला त्या अवघड अवस्थेत वृंदावन हॉस्पीटल येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन तिचे सिजर केले. धावपळीत नवजात बाळाक्या डोक्याला सूज आल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी सिध्दीविनायक हॉस्पीटल मध्ये काचेच्या पेटीत ठेवले आहे. ग्रामीण रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेला शारीरीक व मानसिक व जीवघेणा त्रास सोसावा लागला. या सर्व घटनेस ग्रामीण रुग्णालयातील बे जबाबदार डॉक्टर व महिला कर्मचारी यांच्यावर कार्यवाही व्हावी.

*पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शासकीय योजनेंतर्गत सेवेचा बोजवारा*

शासनाकडून बाळ -बाळंतीण साठी वैद्यकिय योजना कार्यान्वीत असताना पाचोऱ्यातील ग्रामीण रुग्णालयात इमर्जन्सी वेळेत साधी रुग्णवाहीकाही उपलब्ध करुन दिली जात नाही. या रुग्णालयात शासकीय वैद्यकिय सेवेंचा बोजवारा उडविण्यात येतो, रुग्णांना खाजी रुग्णालयात पाठवून कमिशन खाल्ले जाते. कर्तव्यात कसूर करून रुग्णांचा जीव धोक्यात टाकले जाते. बाळाच्या जिवितास हानी झाल्यास ग्रामीण रुग्णालय कर्मचारी जबाबदार असतील असा इशारा तक्रारदार यांनी पाठविलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनाच्या प्रती

किरण पाटील सिव्हील सर्जन, जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी पाचोरा, जिल्हयातील सर्व वृत्तपत्र यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed