06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

पाचोऱ्याचा नातू *आकाश कवडे* यांचे प्रयागराज ( अयोध्या) येथे  *लेफ्टनंट कर्नल पदावर प्रमोशन*

0
IMG-20240427-WA0093

पाचोऱ्याचा नातू *आकाश कवडे* यांचे प्रयागराज ( अयोध्या) येथे

*लेफ्टनंट कर्नल पदावर प्रमोशन*

पाचोरा (प्रतिनीधी)- *आबासाहेब सुर्यवंशी*

पाचोरा येथील श्री.दिगंबर कदम रा. प्रकाश टॉकीज जवळ पाचोरा यांचे नातू आणि सामाजिक कार्यकर्त्या कल्पना कदम यांची बहिण शोभा अनिल कवडे व त्यांचे पती अनिल कवडे राहणार राहुरी (जिल्हा – नगर) येथे हे दाम्पत्य प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी परिवार प्रपंच सांभाळून मुलाला शिक्षण देऊन त्याला सैन्यात भरती करून त्याला देश सेवा करण्याची संधी मिळवून दिली. चिरंजीव आकाश कवडे याने सैन्यात भरती होताना देशाची प्रामाणिकपणे सेवा करण्याची शपथ घेतली होती. त्याने सैन्यात कर्तव्य बजावताना आपल्या कार्याच्या बळावर यश मिळविल्याने त्यांचे उत्तर प्रदेशातील अयोध्या जवळील प्रयागराज येथे त्यांचे लेफ्टनल कर्नल पदावर पदोन्नती झाली आहे . कर्नल आकाश यांच्या यशा बद्दल त्यांचे फौज, नातेवाईक, मित्र परिवार पाचोरा, राहुरी परिसरात कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed