जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक*

*जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक*
आइडियल इंडिया न्यूज़
(जळगाव जिल्हा रिपोर्टर)
*आबासाहेब सुर्यवंशी*
महाराष्ट्र पोलिस विभागात काम करीत असताना उत्कृष्ट उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवार दि.२५ एप्रिल रोजी या पदकांची घोषणा केली. त्यात जळगाव पोलिस दलातील १)संजय नारायण हिवरकर, २) मीनल श्रीकांत साकळीकर, ३)राजेश पंडित पाटील, ४)दिपक देवराम चौधरी, ५)विजय नामदेव सोनवणे, ६)प्रवीण गजानन जाधव, ७)महेश अरविंद बागुल, ८) मोहम्मदअली सत्तारअली सैयद, ९)शकिल अहमद शब्बीर शेख, १०)संजय राजाराम पाटील, ११)राजेश शाहू पाटील यांचा समावेश आहे.
पोलिस दलातील उत्कृष्ठ कार्या साठी सन्मानित होणाऱ्या पोलिस कर्मचारी यांना घोषित झालेल्या पदवी बद्दल सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.