वीडियो न्यूज़*पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाची महासत्तेकडे वाटचाल* आ. किशोर पाटील

*पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाची महासत्तेकडे वाटचाल*
आ. किशोर पाटील
———————————
*दि.४ एप्रिल शनिवारी पाचोरा शहरात रॅलीसाठी आणि दि.५ एप्रिल रविवारी महायुतीच्या महामेळाव्यास उपस्थीती द्यावी* ————————-
माजी आमदार दिलीप वाघ
आइडियल इंडिया न्यूज़
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी) *आबासाहेब सुर्यवंशी*
वीडियो देखें
जळगाव लोकसभा मतदासंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी ,आरपिआय ,रासपमहायुतीच्या उमेदवार सौ.स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराला मतदारसंघातील पाचोरा व भडगांव शहरी व ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटात सर्वत्र जनतेतून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उमेदवार सौ. स्मिताताई प्रचारात प्रत्यक्ष नसल्या तरी मी, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि महायुतीचे सर्व घटक पूर्ण प्रामाणिकपणे, एकदिलाने,दररोज एक जिल्हा परिषद गट पूर्ण करीत असून आतापर्यंत तीन गटात प्रचार पूर्ण झाला आहे. या दरम्यान प्रचार रॅली, बैठकांना जनतेतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सर्वांगीण विकासा साठी अहोरात्र जनतेच्या हितासाठी, देशाच्या विकासाला गती देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मागील दहा वर्षात विकासाला सर्वच क्षेत्रात गती मिळाली आहे. पूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी देशाला इतर देशांवर अवलंबून राहावे लागत होते, आज भारत सर्वच क्षेत्रात स्वयंपूर्ण आणि सक्षम झाला असून मोदींच्या नेतृत्वात देश महासत्ते कडे गतीने वाटचाल करीत आहे. दळणवळण साधनांचा शेतकरी,व्यापारी, यांना सर्वात मोठा फायदा होत आहे. ज्या प्रवासाला दोन ते तीन दिवस लागायचे ते आता काही तासातच होत आहे. रेल्वेचे जाळे देशभरात विणले जात असून रेल्वे स्टेशने अद्यावत होत आहे. बसस्टँड सारखी विमानतळे देशात होत आहे. महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे . देशाच्या मुलीं विविध योजनांमधून लखपती होत आहे. शेतकरी, कातकरी, गोरगरिबांच्या उद्धराचे आणि हितांचे निर्णय होत आहे. विरोधक धर्मवाद, आरक्षण, संविधान बदल, लोकशाही बाबत मोदी आणि भाजपा सरकार बाबत जनतेत आणि मतदारांमध्ये चुकीचा प्रचार ,प्रसार करून स्त्तेसाठी देशाची जगात प्रतिमा मलिन करीत आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्रातून भरपूर निधी मिळत असल्याने राज्य देखील प्रगतीपथावर आहे.
*आज पाचोरा शहरात महायुतीची रॅली*
महायुतीच्या उमेदवार सौ. स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ आज दि.४ एप्रिल शनिवार रोजी पाचोरा शहरात प्रचार रलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक ५ एप्रिल रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे व्यापाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी, सूचना समजून घेण्याकरिता महामेळावा घेण्यात आला आहे. रॅली आणि महाममेळाव्यास मतदासंघातील महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ,
जिल्हा पदाधिकारी सदाशिव आबा पाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रुमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर ,दत्ता बोरसे पाटील, भाजपा जिल्हा , तालुका स्तरीय पदाधिकारी बिजेपी माजीतालुकाध्यक्ष हिंमतसिंग निकुंभ,व्यापारी आघाडीचे, कांतीलाल जैन, माजी शहराध्यक्ष नंदूबापू सोमवंशी, रमेश वाणी, समन्वयक सुनिल पाटील, दिपक माने , रवी पाटील, समाधान मुळे, यांच्या सह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.