महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारास जोरदार सुरुवात*

*महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारास जोरदार सुरुवात*
प्रचाराला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद !
आइडियल इंडिया न्यूज़
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी)
*आबासाहेब सुर्यवंशी*
जळगाव लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील लोहटार – खडकदेवळा जिल्हा परिषद गटात प्रचाराचा नारळ फोडून शिवसेना- भाजपा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा प्रचाराचा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला.ते स्वतः जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना कमळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करीत आहे .या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील ,शिवसेना mतालुकाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील युवराज पाटील , शिवसेना उपतालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, रविंद्र पाटील , शिवसेना अनिल पाटील, नवल गुजर, वसंत पवार गुरुजी, संदीप पाटील, बाळा पाटील, प्रकाश राठोड , प्रल्हाद गुजर, युवासेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे भाजपा तालुकाप्रमुख अमोल शिंदे, भाजपा माजी पंचायत समिती सभापती सुभाष पाटील , प्रदीप पाटील, माजी पंचायत समिती सभापती बन्सीलाल पाटील, रमेश येवले , गोविंद शेलार, डॉ . नीळकंठ पाटील, तसेच शिवसेना- भाजपा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण भागात सर्वत्र भाजपा उमेदवाराच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे..