या ठेकेदारास वठणीवर आणणार कोण?

या ठेकेदारास वठणीवर आणणार कोण?
आइडियल इंडिया न्यूज़
देवीदास महाजन जाकिर शेख
भाड गांव, जलगांव
भडगांव – चाळीसगांव हायवे पासूनच्या प्रवेशद्वारापासून ते कोठली गावापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी व पायी चालणाऱ्यासाठी ठरतोय जीवघेणा, तर रस्त्याचे काम करणारा ठेकेदार मनमानी कारभार करत खडी, डांबरचा आपुरा वापर करून थातूर मातुर पद्धतीने रस्त्याचे काम करत असल्याचा येथील रस्त्याचा वापरकर्त्या ग्रामस्थांकडून आरोप होत असून कोठली ग्रामपंचायतीने देखील सदर काम हे निकृष्ट दर्जाचेच होत असल्याने हे काम ईस्टीमेटननुसार व्हावे अन्यथा उपोषणास बसू अशा आशयाचे निवेदन कार्यकारी अभियंता उपविभाग भडगाव यांना दिनांक 22 एप्रिल 24 रोजी दिले असल्याची माहिती आज दिनांक 1 मे रोजी सकाळी 10 वाजता दिली आहे. तर त्वरित हे काम थांबवण्यात यावे या प्रकरणाची सखोल व तात्काळ चौकशी व्हावी या आशयाचे पत्र कोठली येथील समाजसेवक तथा ट्रेन लाईव्ह न्यूज चे उपसंपादक श्री लक्ष्मीकांत देसले यांनी देखील दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी भडगाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागास देऊन तक्रार दाखल केली आहे.
तर या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे होणाऱ्या कामास थांबवण्यात येईल का, अधिकारी या प्रकरणाकडे लक्ष घालतात की या ठेकेदारास पाठीशी घालतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. तर या ठेकेदारास वठणीवर आणणार कोण असा प्रश्न उपस्थित होतांना दिसून येत आहे.