*देश महासत्ता आणि सुखी करायचा असेल तर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा* आमदार किशोर आप्पा पाटील —*व्यापारी मेळाव्यात आवाहन*

*देश महासत्ता आणि सुखी करायचा असेल तर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा* आमदार किशोर आप्पा पाटील -व्यापारी मेळाव्यात आवाहन*
*सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे मोदी संवेदनशील पंतप्रधान* महा.राज्य व्यापारी महासंयोजक नितीन पोकळे
आइडियल इंडिया न्यूज़
(जळगाव जिल्हा प्रतिनिधि)
*आबासाहेब सुर्यवंशी*
पाचोरा- महायुतीच्या उमेदवार सौ. स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा येथील जैन पाठ शाळेत दिनांक ६ रविवार रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील व्यापारी बांधवांचा व्यापारी स्नेह मेळावा व्यापारी आघाडीचे राज्याचे महा .राज्याचे संयोजक श्री. नितीन पोकळे, यांच्या अध्यक्षतेत तर पाचोरा भडगांव मतदासंघां चे लोकप्रिय ,कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील, पाचोरा तालुका व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रमेश वाणी, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, राज्य व्यापारी आघाडीचे पदाधिकारी प्रकाश सुराणा,सौरव कोतकर,महेश वाघ, भाकेत कासार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, यांच्या प्रमुख उपस्थितीत तर यांच्या सह शिवसेना व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रवी केसवाणी, आदीं व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी बाजार समितीचे सभापती माजी सतिशबापू शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर सदाशिव आबा पाटील, यांच्या सह जळगाव जिल्हा व पाचोरा तालुका व्यापारी आघाडीचे माजी अध्यक्ष , माजी पदाधिकारी कांतीलाल जैन, मोटुमल वाधवानी, जगदीश पटवारी, मोहन अग्रवाल, किशोर संचेती, मनोज शिसोदिया, लक्ष्मीकांत पटवारी,संदीप मालपुरे, भरत शेंडे, राहुल जैन,जैन पाठ शाळा समिती अध्यक्ष बबलू जैन,रवींद्र पाटील, डॉ.नीळकंठ पाटील,यांच्या सह शहरातील व्यापारी बांधव शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रास्ताविक मनोगतात *भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे* यांनी यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारी ,देशाच्या अस्मिते ची असून तिसऱ्यांदा देशाला नरेन्द्र मोदी हेच पंतप्रधान का असावे, तसेच मोदींनी व्यापारी , व्यापार या क्षेत्रात केलेले बदल आणि त्याचे फायदे या बाबत चर्चेत संवाद साधला.
*व्यापारी आघाडीचे राज्याचे संयोजक श्री नितीन पोकळे* यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, व्यापाऱ्यांना जात, धर्म, पक्ष , चेहरा नसतो. व्यापारी परिश्रम , मेहनत करून आपले स्थान निर्माण करतो. आणि समाजाच्या सर्व घटकांना मदत करत असतो. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था सुधारली आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित, व्यापार करण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या कायद्यांचे फायदे – तोटे यावर प्रकाशझोत टाकला. नरेंद्र मोदी हे एक संवेदनशील पंतप्रधान असून २०४७ या कालखंडात देश कोठे, कसा असेल यावर ते काम करीत आहेत. सर्वसामान्य गोरगरीब व्यापारी यांच्या समस्या पाहून ते व्यापाऱ्यांच्या पाठीशि उभे राहिले, कर्ज आणि बँकेच्या जाचक अटी दूर करून त्यांनी सामान्य व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे महान कार्य केले.
*आमदार किशोर आप्पा पाटील* यांनी अभ्यासपूर्ण मनोगतात व्यापारी बांधव हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांना राजकारणाची दिशा कळते. व्यापारी बांधवांना कोणाला मतदान करण्याचे सांगण्याची आवश्यकता पडत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेतील व्यापारी महत्वाचा घटक असतो. त्यांना कोठे फायदा, कोठे नुकसान होणार याची चाहूल आगोदरच लागते. व्यापारी समस्या, अडचणी, मा या वर बोलतांना आमदार म्हणाले की, मागील साठ ते सत्तर वर्षांच्या इतिहासात डोकावून पाहिले तर नतभ्रष्ट काँगेसच्या काळात जगात भारताकडे गरीब देश म्हणून पाहिले जात होते. आणि आज नरेन्द्र मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात जगात भारताचा सर्वत्र सन्मान आणि दबदबा आहे. जी अर्थव्यवस्था ११ व्यां स्थानावर होती ती मोदींनी कोरोना आपत्ती झेलून देखील पाचव्या क्रमांकावर आणली आहे, त्यांच्या नेतृत्वात आज देशाच्या सर्व घटकांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा, महीलासाठी व्यावसायिक कर्ज सुविधा , मुलींसाठी लखपती योजना, शैक्षणिक , नोकरीत सवलती शेतकरी, व्यापारी यांच्या हितांचे निर्णय त्यांनी घेतले, व्यापार सहज सोपा व्हावा म्हणून मोदींनी सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी बँकेचे कर्ज धोरणांमध्ये बदल करून लहान , मोठे व्यापारी बांधवाना कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वांची गॅरंटी त्यांनी घेतली, जिएसटी बाबत विरोधकांकडून गैरसमज निर्माण केला जात आहे.आज ग्लोबल, डिजिटल सिस्टीम सुधारली तर ती फक्त मोदींच्या दूरदृष्टीच्या धोरणातून. त्यांच्या कडे विकासाचे व्हिजन आहे.देशाला प्रगतीच्या दिशेने आणी देश, देशाचा नागरिक सुखी ठेवायचा असेल तर वेळ प्रसंगी विविध स्तरांवर कठोर निर्यांची अंमलबजावणी करावी लागते. भारताकडे वाकडी नजर उचलून पाहणाऱ्यांना मोदींनी घरात घुसून मारण्याचा इशारा सर्जिकल स्ट्रईक करून दाखविल्याने जगात भरताच्या सैनिकी क्षमतेची जगाला जाणीव करून देणारा एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.देशाला महासता बनविण्यासाठी आणि देशाला सुरक्षित आणि प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे आणि सर्वांनी मतदानाच्या हक्क बजावण्याचे भावनिक आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन नीरज मुनोत यांनी केले.