पाचोरा तालुक्यात संजय वाघ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा प्रचार* *सामान्य जनतेशी साधला थेट संवाद*

*पाचोरा तालुक्यात संजय वाघ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा प्रचार*
*सामान्य जनतेशी साधला थेट संवाद*
- आइडियल इंडिया न्यूज़
(जळगाव जिल्हा प्रतिनिधि)
*आबासाहेब सुर्यवंशी*
जळगाव लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील (पवार)यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय वाघ यांच्या नेतृत्वात तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार फेरी काढत सामान्य जनतेशी थेट संवाद साधून प्रचाराची गती वाढवली जात आहे.
संजय वाघ यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत तालुक्यातील अंतूर्ली, ओझर,भातखंडे महत्वपूर्ण गावातून सामान्य जनतेशी थेट संवाद साधला गेला असून यावेळी सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वात सरकार स्थापनेसाठी करण पवार यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नितीन तावडे, पी डी भोसले, पाटील, हेमंत पाटील, विक्रांत पाटील, रणजीत पाटील, भातखंडे खुर्द येथील दत्तू कुमावत, रवींद्र पाटील, योगेश पाटील, कल्पेश पाटील, दिनेश पाटील, धनंजय पाटील, राज सोनवणे, पवन पाटील, सुयोग पाटील, विनोद पाटील, निलेश पाटील, अंतूर्ली येथील वसंत पाटील, बाळू पाटील, दशरथ पाटील, पोपट पाटील, रंगनाथ पाटील, सुनील पाटील, रामा वाघ, शिवाजी पाटील, ओझर येथील हेमराज पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील,आनंदा पाटील, गुलाबराव पाटील, धोंडू पाटील,शरद पाटील, सुनील पाटील,रामचंद्र पाटील, विनोद पाटील यांचे सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.