पाचोरा महायुतीच्या मेळाव्यात……*महाविकास आघाडीवर पालकमंत्र्यांचे टीकेचे बाण*

पाचोरा महायुतीच्या मेळाव्यात……*महाविकास आघाडीवर पालकमंत्र्यांचे टीकेचे बाण*
———————————–
*महाविकास आघाडीची हवा कोठेच नाही* पालकमंत्री गुलाबराव पाटील
———————————–
*लोकसभेत विजय महायुतीचाच* दिलीपभाऊ वाघ.
*उन्मेष पाटील निष्क्रिय खासदार* आ.किशोर आप्पा पाटील. —
*खासदार जनतेच्या कर्जाची उतराई करणारा असावा* उमेदवार सौ.स्मिताताई वाघ
*उन्मेष पाटील गद्दार खासदार* भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधूभाऊ काटे
आइडियल इंडिया न्यूज़
(जळगाव जिल्हा प्रतिनिधि)
*आबासाहेब सुर्यवंशी
पाचोरा येथे दिनांक ४ एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता सारोळा रोड येथे महायुतीच्या लोकसभा उमेदवार सौ. स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा – भडगांव मतदासंघांच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांचा महामेळावा शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री, पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाब राव पाटील यांच्या अध्यक्षतेत तर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ , आमदार किशोरआप्पा पाटील,
चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. जळकेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी सभापती सतिष शिंदे, भाजपा प्रदेश पदाधिकारी भाऊसाहेब डी .एम पाटील, भुरा आप्पा पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील,अनिल धना पाटील, राष्ट्रवादी भडगांव तालुकाध्यक्ष हर्षल पाटील , सोमनाथ पाटील, प्रा.भागवत महालपुरे, शिवदास पाटील महीला आघाडीच्या अभिलाषा रोकडे,भाजपचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हा पदाधिकारी सदाशिव आबा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, माजी शहराध्यक्ष नंदुबापु सोमवंशी, रमेश वाणी , शहराध्यक्ष दिपक माने निवडणूक जिल्हा प्रबंधक सुनिल पाटील ,समन्वयक गोविंद शेलार, आदि सह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रीपाई घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते. मेळाव्यात जिल्हाध्यक्ष श्री. जळकेकर, राष्ट्रवादी भडगांव तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, अनिल धना पाटील, भाऊसाहेब डी.एम.पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
———————————–
प्रास्ताविक मनोगतात *भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे*— यांनी ही निवडणूक देशाच्या विकासासाठी आहे. मतदासंघात ही निवडणूक माजी आ. दिलीपभाऊ वाघ आणि आ. आप्पासाहेब किशोर पाटील यांच्या नेतृत्वातच लढली जात असल्याचे स्पष्ट केले. मागील पंचवार्षिक पेक्षा यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली.
———————————–
*जिल्हाउपाध्यक्ष मधुकर काटे* यांनी खासदार उन्मेष पाटील हे गद्दार खासदार असून त्यांनी मतदासंघात कोणतेही विकास कामे केली नसल्याची परखड शब्दात टीका केली.
———————————–
*माजी आमदार दिलीप वाघ* म्हणाले की राजकारणात काहीही घडू शकते, मागील काळात आम्ही महाविकास सोबत होतो, मात्र आता महायुतीत आहोत .होणाऱ्या मतदानातून महायुतीचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*आमदार मंगेश चव्हाण* यांनी भाषणात खासदार उन्मेष पाटील पाच वर्ष मतदार संघात दिसलेच नाही, तर रेल्वे विभागात माहितीच्या आधारावर विचारणा केल्यास उन्मेष पाटील यांनी रेल्वेत पाच वर्षात किती वेळा कोणासोबत प्रवास केला असा गौप्यस्फोट केला. तसेच मतदासंघ तर सोडाच ज्या गावात जन्मले त्या गावाचा देखील विकास हा माणूस करू शकला नसून येत्या सहा महिन्यात उन्मेष पाटील चावथ्या पक्षात दिसेल. अशी अनेक उदाहरणे देवून आ.चव्हाण यांनी खासदार उन्मेष पाटील यांचे चिरहरण केले.
*आमदार किशोरआप्पा पाटील* यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्य शैलिवर कडव्या भाषेत टीका करतांना गरजले की, मी सर्वात आगोदर मोदीजी आणि अमित शहा यांचे अभिनंदन करतो की त्यांनी एक निष्क्रिय खासदाराचे तिकीट कापून निष्ठावान कार्यकर्त्या सौ. स्मिताताई वाघ यांना लोकसभेची उमेदवारी दिली. उन्मेष पाटील, उमेदवार करण पवार, त्यांचे समर्थक, प्रचारक राजकीय नौटंकी बाज असल्याची जहरी टीका त्यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था सुधारली, देशाला जगात नविन ओळख आणि दबदबा निर्माण केला. सर्व घटकांच्या विकासासाठी केंद्रातून भरपूर निधी प्राप्त करून देणारे असल्याने आज माझ्या मतदासंघांत जो काही विकास दिसतो त्याचे श्रेय केन्द्र सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार यांना जाते. विरोधकांच्या बदनामीच्या राजकारणाला बळी न पडता मी, दिलिप भाऊ वाघ,भाजप आणि सर्व घटक पक्षातील लोकं एकदिलाने काम करीत असून ताईंना मागच्या पेक्षा जास्त लाखोंच्या फरकाने विजयी करणार असल्याचा आत्मविश्वास दिला.
*उमेदवार सौ. स्मिताताई वाघ* म्हणाल्या की जनतेने निवडून दिलेला खासदार हा जनतेची कामे करणारा आणि मतदारांनी , जनतेची विकास कामे करून त्यांच्या मतदानाच्या कर्जातून उतराई करणारा असावा. जनतेने दिलेले मत हे मोदींना असेल .
*पालकमंत्री गुलाबराव पाटील* अध्यक्षिय भाषणात म्हणाले की, ही लोकसभा निवडणूक गाव, गल्लीत गटार , वाटर, मीटर कामांची नसून देशाचे भविष्य ठरविणारी आणि अस्तित्वाची आहे.विरोधक म्हणतात आमचीच हवा आहे. यांची कोठेच हवा नाही, केवळ अफवा फैलविणे हा उद्योग विरोधक प्रत्येक तालुक्यात करीत आहेत. आमच्या प्रामाणिकतेवर शंका काय घेता.? पस्तीस, चाळीस वर्षे खस्ता खाऊन आम्ही शिवसेना वाढविली शेरोशायरी अंदाजात विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी विरोधकांवर शब्द बाणांचे आणि टीकेचे तिर सोडून बरसले. ज्यांच्या दहा वर्षाच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत परोळ्याच्या जनतेला अठरा दिवस जे पाणी देवू शकत नाहीत ते मतदासंघांचा काय विकास करतील. जे कालपर्यंत भारतीय जनता पक्षात होते ते आम्हाला राजकारण शिकवतील का ! भाषणाचा शेवट करतांना म्हणले की, *आम्ही ” एका बापाची ” ओलाद आहोत*. उमेदवार सौ स्मिताताई वाघ यांना लोकसभेत निवडून देण्यासाठी *भाजप वाले काम करो, अथवा नका करो* * शिवसेना *डंके* की चोट वर प्रामाणिक प्रचार करणार आहे. असा टोला त्यांनी नेमका कोणाला !!! उद्देशून लगावला याचा अंदाज येणाऱ्या काळात समजून येईल.?