धनकवडी पुणे 46 शंकर महाराज मठ श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा ७७ वा समाधी सोहळा

धनकवडी पुणे 46 शंकर महाराज मठ
श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा ७७ वा समाधी सोहळा
आइडियल इंडिया न्यूज़
राहुल दाहोत्रे, पुणे महाराष्ट्र
श्री सद्गुरू शंकर महाराजांचा ७७ वा समाधी सोहळा दिनांक ९ मेथी १६ मे २०२४ दरम्यान साजरा होत आहे.
मुख्य समाधी सोहळा व पालखी सोहळा हा वै. शु. दुर्गाष्टमी दिनांक १५ मे बुधवार रोजी संपन्न होईल.
दर्शन व्यवस्था- समाधी दर्शन गुरुवार दिनांक ९.५.२०२४ ते बुधवार दिनांक १५.५.२०२४ या कालावधीत समाधी मठ २४ तास खुला राहील गुरुवार दिनांक १६ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता काल्याची कीर्तन संपन्न होईल, सालाबाद प्रमाणे मठ दर्शनासाठी बंद होईल आणि १७ मे रोजी सकाळी ६ वाजता मठ समाधी दर्शनासाठी खुला होईल.
भजन कीर्तन व संगीत महोत्सव सकाळी ९ ते रात्री ९.३० पर्यंत पत्रिकेत दिलेल्या वेळापत्रकानुसार होईल.
यात मुख्य गायन व कीर्तन कार्यक्रम दररोज सकाळी ७ ते रात्री ९.३० पर्यंत होतील यात खाली नमूद केलेले कलाकार गायन सेवा रुजू करतील.
९.५.२०२४गुरुवार पं. श्री. विजय कोपरकर.
१०.५.२०२४ शुक्रवार डॉ. ह. भ. प. श्री. भावार्थ देखणे.
११.५.२०२४ शनिवार ह. भ. प. श्री. पांडुरंग घुले महाराज.
१२.५.२०२४ रविवार पं. श्री. संजीव अभ्यंकर
१३.५.२०२४ सोमवार श्री. राहुल देशपांडे
१४.५.२०२४ मंगळवार डॉक्टर सौ. रेवा नातू
तसेच समाधी सोहळ्यात रोज विविध फुलांची आरास समाधीला करण्यात येणार आहे. त्यामध्ये सोनचाफा, आंबा महोत्सव, कमळ गुलाब महोत्सव, मोगरा महोत्सव, दवना महोत्सव, विड्याच्या पानाची पूजा यांचा समावेश आहे.
सप्ताहात त्रिकाळ आर्थिक सकाळी ७, दुपारची आरती १२ आणि सायंकाळची आरती ६.३० वाजता होईल महाप्रसाद वाटप ९.५.२०२४ ते १४.५.२०२४रोजी दररोज सायंकाळी ७.३० ते १०.३०.
दिनांक १५ मे रोजी महाप्रसाद दुपारी १२.३० ते रात्री १०.३० पर्यंत.
दिनांक १५ मे रोजी पालखी सोहळा दुपारी ४.३० ते ६.३० यावेळी संपन्न होईल.
दिनांक १५ मे रोजी रक्तदान शिबिर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत घेण्यात येईल.
रिपोर्टर राहुल दाहोत्रे