महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार करण पाटील प्रचंड मताधिक्याने निवडून येतील*

*महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार करण पाटील प्रचंड मताधिक्याने निवडून येतील*
———————————-
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात नेत्यांना विश्वास
आयडीयल इंडिया न्युज रिपोर्टर
आबासाहेब सुर्यवंशी
पाचोरा –
सत्ताधार्यांबाबत जनतेत नाराजी आहे. प्रचार करतांना मतदार महाविकास सोबत दिसत आहे. मतदाना च्या शेवटच्या टप्प्यात गाफील राहू नका असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाचोरा येथे आयोजीत मेळाव्यात दिला. *अचूक नियोजन करून करण पाटील यांना वाढीव मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार*
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा-भडगाव महाविकास आघाडीच्या वतीने एकदिलाने प्रचार करण्यात आला. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी प्रचारात मतदारसंघ पिंजून काढला आहे. जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाचोर्यातील समर्थ लॉन्स येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याला माजी खासदार उन्मेषदादा पाटील, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन तावडे, विकास पाटील, कॉंग्रेसचा तालुकाध्यक्ष सोमवंशी आणि महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.
माजी खासदार उन्मेषदादा पाटील, वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, ऍड. अभय पाटील आदीं प्रमुख ज्येष्ठ नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. निवडणूक काळात प्रचाराचा आढावा घेतांना मतदानासाठी योग्य नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या अतिशय कडक उन्हाळा असल्यामुळे दुपारच्या ऐवजी सकाळीच मतदारांना बुथवर घेऊन जाण्याच्या सूचना पदाधिकार्यांना देण्यात आल्या. अचूक नियोजन करून करण पाटील यांना वाढिव मताधिक्य देण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
मेळाव्याला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, आम आदमी पक्ष आदी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.