Video News –वैशालीताई सुर्यवंशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क*

*वैशालीताई सुर्यवंशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क*
*मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदान करण्याचे केले आवाहन*
*पाचोरा दिनांक १३ (जळगाव जिल्हा प्रतिनिधी )
आबासाहेब सुर्यवंशी
वीडियो देखें
जळगाव लोकसभा मतदारसंघात आज होत असलेल्या मतदानात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्यासाठी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघात प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. प्रचारात मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला. १३ मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास भडगांव रोडवरील पीटीसी संचलीत एमएम महाविद्यालयात त्या मातोश्री श्रीमती कमलताई पाटील, पती नरेंद्रसिंग सुर्यवंशी आणि कन्या कु. सिद्धी सुर्यवंशी यांच्यासह मतदान क ण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी बुथ क्रमांक २०६ मध्ये आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
तसेच या प्रसंगी त्यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेने लोकशाहीतील सर्वोच्च हक्क असणारे मतदान करण्याचे आवाहन केले.