सोयगाव तालुक्यात उष्मांघाताचा पहिला बळी*

*सोयगाव तालुक्यात उष्मांघाताचा पहिला बळी*
रिपोर्टर – आबासाहेब सूर्यवंशी, पाचोरा/ ज्ञानेश्वर वाघ ,सोयगाव —————
पाचोरा /सोयगाव- सोयगाव तालुक्यातील कवली येथे उष्मांघात मुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे शेतातून खरीप पूर्व मशागतीची कामे आटोपून गुरुवारी दुपारी घरी आलेल्या शेतकऱ्यांला सायंकाळी घाम आल्यामुळे अत्यवस्थ होऊन त्रास जाणवू लागल्याने त्यास तातडीच्या उपचारासाठी पिंपळगाव(हरे) ता पाचोरा येथे हलविण्यात आले होते पुढील उपचारासाठी पाचोरा येथे घेऊन जात असताना त्यांचा गुरुवारी रात्री नऊ वाजता उष्मांघात मुळे मृत्यू झाला शुक्रवारी दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे .
प्रकाश भागवत तराल (वय६२) असे उष्मांघात मुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. कवली शिवारात गट क्र-७८ मध्ये गुरुवारी ते शेतात गेले असता दुपारी एक वाजता घरी आले त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांना अत्यवस्थ वाटू लागून घाम आला व चकरा येऊ लागल्या त्यांना तातडीने उपचारासाठी पिंपळगाव(हरे) येथे खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी पाचोरा येथे हलवितांना त्यांचा रस्स्त्यातच मृत्यू झाला याप्रकरणी तालुका आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे तर महसूल विभागाने नोंद केली आहे सोयगाव तालुक्यात आठवड्याभरापासून विक्रमी तापमानाची नोंद होत असताना सलग तीन दिवस ४३ अंशावर असलेल्या तापमानाने गुरुवारी व शुक्रवारी सलग दोन दिवस ४४ अंशावर तापमानाची विक्रमी नोंद सोयगाव तालुक्यात झाली आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यात शुकशुकाट पसरला आहे दरम्यान उन्हाच्या तापमानामुळे तालुका आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे
कोट—सोयगाव तालुक्यात विक्रमी तापमानाची नोंद होत आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे तसेच उन्हातून सावलीत जाऊ नये त्रास जाणवत असल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा सोयगाव तालुक्यात उष्मांघात प्रतिबंध पुरेसा औषध साठा आहे असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ गितेश चावडा यांनी सांगितले आहे .———
उष्मांघात मुळे मृत शेतकरी प्रकाश तराळ यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले सुना नातवंडे एक भाऊ असा परिवार आहे.