निमित्त मोक्षदा एकादशी तथा गीता जयंतीचे…
आइडियल इंडिया न्यूज़
विद्या मोरे
कराड दि. ३, – निमित्त मोक्षदा एकादशी तथा गीता जयंतीचे… शिक्षण मंडळ, कराड संचलित शाळांमधील मुलांनी आज इतिहास घडवत, ३ मिनिटात संपूर्ण भगवद्गीता लेखन केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने या उपक्रमाची विश्वविक्रम म्हणून नोंद घेतली. येथील टिळक हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. रेकॉर्ड नोंदविणारे मान्यवर परीक्षक अशोक अडक यांनी हा विक्रम संस्थेने यशस्वीपणे नोंदविला असल्याचे सांगून सन्मानपत्र बहाल केले.
शिक्षण मंडळ, कराड ही शैक्षणिक संस्था शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या निमित्ताने संस्थेने अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी भगवद्गीता लेखन हा उपक्रम गीता जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला.
शिक्षण मंडळ, कराड संचालित टिळक हायस्कूल, लाहोटी कन्या प्रशाला, एसएमएस इंग्रजी माध्यमाची शाळा ( Smems Karad) आणि आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी येथील ७४० मुलामुलींनी प्रत्येकी एक श्लोक केवळ 3 मिनिटात लिहिला. या प्रभावशाली उपक्रमाने शिक्षण मंडळ, कराडचे आणि अवघ्या महाराष्ट्राचे नाव जगभरात पोहोचविले.
प्रारंभी संस्थेचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी स्वागतपर सत्कार केले. या उपक्रमाबाबत अनुक्रमे मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतून निवेदन अनुक्रमे सुवर्णा देशपांडे, प्रा. मेघना मल्लापुर, मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांनी केले. सायंकाळी ठीक ५ वाजता उपक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी भगवद्गीता श्लोक लेखन केले.
हा विक्रम नोंदविल्याबद्दलचे प्रमाणपत्र संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांनी स्वीकारले. यावेळी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सहसचिव राजेंद्र लाटकर, यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांचे प्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका व कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन संस्कृतिका समन्वयक माधुरी कुलकर्णी यांनी केल