06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

विद्यार्थ्यांच्या हृदय व मेंदूपर्यंत पोहोचणारी मातृभाषाच असते .यासाठी विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा अभिमान बाळगावा.

0

पीयूष प्रकाश गौर

कराड प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या हृदय व मेंदूपर्यंत पोहोचणारी मातृभाषाच असते .यासाठी विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा अभिमान बाळगावा. पुढील दहा वर्षात भारत जगातला सर्वात तरुण देश असेल . त्यावेळी भारत जगाचे नेतृत्व करायला सज्ज असेल .शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूल ही कराडची वैभव स्थाने आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षण मंडळाने व टिळक हायस्कूलने देशाच्या जडणघडणीत अनेक दिग्गज विद्यार्थी दिले आहेत. यशवंतराव चव्हाण व पै. खाशाबा जाधव या कराडच्या सुपुत्रांनी महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाची मान उंचावलीअसल्याचे गौरोद्गार महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले.

 

येथील शिक्षण मंडळ कराड या संस्थेच्या व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित समारंभ प्रसंगी ते बोलत होते .अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी होते . यावेळी  संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल हुद्देदार, व्हाइस चेअरमन अनघा परांडकर ,सचिव चंद्रशेखर देशपांडे ,सहसचिव राजेंद्र लाटकर, मुख्याध्यापक गोकुळ अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होते.

ना. केसरकर म्हणाले ,या भूमितील शिवाजी महाराज व महाराणी ताराबाई महाराष्ट्राची श्रद्धास्थाने आहेत .महाराष्ट्राची मुले हुशार आहेत त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी नवीन सरकार कटीबद्ध आहे. विद्यार्थी हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू मानला पाहिजे. त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विद्यार्थ्यांना घडवणारया शिक्षकांच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत ही नवीन सरकारची प्रामाणिक भावना आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते ते आम्ही निकाली काढून 61 हजार शिक्षकांना एकाच वेळी न्याय दिला आहे .यापुढे शिक्षण क्षेत्रासाठी प्रत्येक वर्षासाठी अकराशे कोटी याप्रमाणे पुढील पाच वर्षासाठी साडेपाच हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. दर्जेदार व कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. स्वातंत्र्याच्या अग्रभागी असणारे लोकमान्य टिळकांच्या स्मृती जपण्यासाठी टिळक हायस्कूलची स्थापना झाली ही अभिमानाची बाब आहे. तो राष्ट्रीय शिक्षण देण्याचा वसा व देशभक्ती जागृत ठेवण्याचा वसा या शाळेने जोपासला याचे समाधान वाटते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचे रोपटे लावले त्याची जोपासना करण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी सतर्क असणे काळाची गरज आहे .आजच्या बदलत्या युगात पालक व विद्यार्थी इंग्रजी माध्यमाकडे वळताना दिसत आहेत .जागतिक पातळीवर शिक्षण तंत्रज्ञान आज इंग्रजीमध्ये पाहायला मिळते आहे . मात्र इंग्रजी ही जगाची शिक्षणाची भाषा नाही . जर्मनी सारख्या विकसित देशाने जगाला सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ जरी दिले असले तरी त्यांचे सर्व शिक्षण त्यांच्या मातृभाषातूनच होते .फ्रान्स देशाचा सर्व कारभार फ्रेंच भाषेमध्ये चालतो. इंग्रजी ही भाषा संपर्काची आणि संवादाची भाषा असली तरी ती जगाची शिक्षणाची भाषा कधीही नव्हती .रशियाने अंतराळात स्वतःचे साम्राज्य निर्माण केले असले तरीही रशियात कोणीही इंग्रजी बोलत नाही .त्यांचा सगळा व्यापार रशियन भाषेतच चालतो .याचाच अर्थ आजच्या विद्यार्थ्यांनी मातृभाषेला प्राधान्य द्यावे व स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करून जगावरती राज्य करण्यासाठी सज्ज व्हावे. पुढील दहा वर्षात भारत जगातला सर्वात तरुण देश असेल यापुढे भारताने जगाचे नेतृत्व करावे.जगाला लागणारे सर्व प्रशिक्षित मनुष्यबळ केवळ भारतच पुरवू शकेल . जगाला जे जे उत्कृष्ट हवे आहे ते भारतच देऊ शकेल.

ते म्हणाले, बदलत्या शैक्षणिक धोरणात शालेय शिक्षणाला व्यवसायिक शिक्षणाची जोड दिल्याने देशात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होईल .सर्वात तरुण प्रशिक्षित मनुष्यबळ केवळ भारताकडेच असेल याचा आपण सर्वांनी अभिमान बाळगावा .देशाच्या पुढील पिढीने जगावर राज्य करावे ते हातात शस्त्र न घेता मात्र जगाला उत्कृष्ट सेवा देऊन जगाचे प्रेम प्राप्त केल्यास भारत जगावरती राज्य करू शकतो.  राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक ,वैद्यकीय सर्व क्षेत्रांमध्ये शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलने सक्षम विद्यार्थी घडवलेले आहेत याचा सार्थ अभिमान आहे .यशवंतराव चव्हाण साहेब व देशाला पहिले  कुस्ती मधील ऑलिम्पिक पदक प्राप्त करून देणारे पै.खाशाबा जाधव, राज्याचे शिक्षण सचिव म . रा. कोल्हटकर , न्यायमूर्ती शालिनी फणसळकर असे शेकडो विद्यार्थी टिळक हायस्कूलने घडविले आहेत .ही संस्था केवळ कराडचाच अभिमान नाही तर महाराष्ट्राचा अभिमान आहे. मी शिक्षण मंत्री या नात्याने शिक्षण मंडळवरती लक्ष ठेवणे हे माझे कर्तव्य मानतो .शासन म्हणून मी संस्थेच्या व शाळेच्या पाठीशी सदैव खंबीर उभा राहीन. या वेळी मंत्री महोदयांनी स्वतःचे निधीतून संस्थेसाठी देणगी देण्याचा मानस जाहीर केला. या शाळेत शिकलेले यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे संरक्षण मंत्री होते. चीन भारत युद्धा वेळी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना बोलावून घेतले. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण मंत्री म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली. आणि युद्ध जिंकले. संरक्षण क्षेत्रात पहिल्या तीन देशांच्या देशामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे तो केवळ टिळक हायस्कूलमध्ये शिकलेल्या संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच. कराडच्या या सुपुत्राने देशाच्या संरक्षण क्षेत्राची मान उंचावल्याचा सार्थ अभिमान आहे .शिक्षण मंडळ कराड व टिळक हायस्कूल ही कराडची वैभव स्थानी आहेत याचा सार्थ अभिमान आहे.
यावेळी संस्थेच्या विविध शाखातील उज्वल हे संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .संस्थेचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले .व्हाईस चेअरमन अनघा परांडकर यांनी परिचय करून दिला. चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी व संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल हुद्देदार यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed