महानायक वसंतरावजी नाईक साहेबांच्या विचारांची क्रांती समाजात निर्माण होणे काळाची गरज* डॉ.व्यंकटेश राठोड….. (प्रदेश अध्यक्ष भा.बं.स.क.से.स्था)

*महानायक वसंतरावजी नाईक साहेबांच्या विचारांची क्रांती समाजात निर्माण होणे काळाची गरज* डॉ.व्यंकटेश राठोड…..
(प्रदेश अध्यक्ष भा.बं.स.क.से.स्था)
कल्याण दि 2जुलै:-
हरित क्रांतीचे प्रणेते, कृषी विद्यापीठाचे जनक, रोजगार हमी योजनेचे जनक, बंजारा हृदय सम्राट, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विकास पुरुष, महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची 110वी जयंती राज्यात विविध ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
*महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मंदिर हॉल कल्याण पश्चिम येथे गुणवंत, पदोन्नती, नवनियुक्त, सेवानिवृत्त, विशेष प्राविण्य मिळवलेल्या खेळाडू इत्यादींना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन ठाणे जिल्हा व ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारणीच्या वतीने आयोजन व नियोजन करण्यात आले होते*.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश राठोड यांनी भूषविले.तर प्रमुख पाहुणे म्हणून डेप्युटी इंजिनियर मा. श्री. राधेश्यामजी आडे, मा सुदाम जाधव सहाय्यक आयुक्त भिवंडी महानगरपालिका तर विशेष अतिथी म्हणून मा. श्याम चव्हाण माजी जिल्हा नियोजन अधिकारी मुंबई, मा. एकनाथ भाऊ राठोड माजी प्रदेश महासचिव उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याला अजून विकास साधायच असेल समाजाला विकासाच्या दिशेने वाटचाल करावयाची असेल तर महानायक वसंतरावजी नाईक साहेबयांच्या विचारांची क्रांती सर्वसामान्यांमध्ये, समाज बांधवांमध्ये निर्माण होणे काळाची गरज आहे. डॉक्टर व्यंकटेश राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भावना व्यक्त केली. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या भावनेला प्रतिसाद दिला. तर
माननीय राधेश्यामजी आडे साहेबांनी नाईक साहेब यांच्या कार्य कर्तृत्व, नेतृत्व, काम करण्याची शैली, विचारांना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या राज्य विभाग जिल्हा तालुका कार्यकारणीतील पदाधिकारी , सदस्य, आजीवन, सभासद, संस्थेचे हितचिंतक, कर्मचारी अधिकारी, नायक, कारभारी ,हसाबी ,नसाबी, नवतरुण, माता,भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य कार्यालयीन सचिव मा. अनिल भाऊ राठोड यांनी केली. त्यांच्या प्रस्ताविकेतून नाईक साहेबांचे आचार, विचार जिवंत ठेवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. मत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रो कबड्डी अंपायर तथा भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था प्रदेश संघटन सचिव मा. आत्माराम चव्हाण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल राठोड यांनी आभार प्रदर्शन करून अध्यक्षाच्या सहमतीने कार्यक्रमाची सांगता केली.
*अतिशय उत्तम आणि आदर्शदायी कार्यक्रम घडून आल्यामुळे भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे सर्व स्तरातून कौतुकाच्या वर्षा होत आहे*.

🖋️🖋️🖋️🖋️

*शब्दांकन*
नितीन रमेश जाधव
बदलापूर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed