भड़गांव येथे आर टी ओ कार्यालय व दिव्यांग कार्यालय झाले पाहीजे या करिता रास्ता रोको आंदोलन शुरू आहे|

भड़गांव येथे आर टी ओ कार्यालय व दिव्यांग कार्यालय झाले पाहीजे या करिता रास्ता रोको आंदोलन शुरू आहे|
भडगावकरांचा आज रास्ता रोको
आज दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सर्व भडगावकरांनी रास्ता रोको आंदोलन केले रास्ता रोको आंदोलनाचे कारण होते गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय म्हणजे आरटीओ कार्यालय व आदिवासी विकास कार्यालय होणे हे भडगावकरांसाठी एक आनंदाची गोष्ट होती परंतु काही दिवसापूर्वी हे
कार्यालय चाळीसगाव येथे मंजूर झाले अशा बातम्या झळकल्या म्हणून भडगावकर पेटून उठले आजपर्यंत भडगाव ला नेहमी विधानसभा मतदारसंघांमध्ये सावत्रपणाची वागणूक मिळते असे दिसले आहे त्याचे कारण आधी पारोळा तालुक्याला जोडला गेलेला हा तालुका आणि आता पाचोरा तालुक्याला जोडला गेला म्हणून भडगाव शहरातील किंवा तालुक्यातील कोणीही आमदार स्थानिक नाहीत त्यामुळे शासकीय कार्यालयांच्या बाबतीत भडगाव शहर मागे आहे जे शहर गिरणा माईच्या काठी वसलेले आहे इतर शहराच्या तुलनेने मध्यवर्ती ठिकाण आहे जर या शहरातून रेल्वे लाईन गेली असती तर हे इतर शहरांना मागे टाकले असते व या ठिकाणी राहणाऱ्या सर्वांचा विकास झाला असता पण आज देखील या शहराला दुसऱ्या शहरावरती अवलंबून राहावे लागते म्हणून हे भडगावकरांना आता पटलेले नाही म्हणून भडगावकर पेटून उठले त्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते विविध सामाजिक संघटना तसेच विविध सामाजिक महिला संघटना विविध संस्था यांनी या आंदोलनात भाग घेतला व जवळपास हजारोच्या संख्येने या रास्ता रोको साठी उपस्थिती होती आता भडगावकर मागे हटणार नाहीत जोपर्यंत कार्यालय होणार नाहीत अशी भूमिका भडगावकरांनी घेतली आहे म्हणून शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन आरटीओ ऑफिस व आदिवासी विकास कार्यालय हे भडगाव येथे झालेच पाहिजे ही स्पष्ट भूमिका भडगावकरांची आहे आणि ती भूमिका कायम राहील जो भडगावकरांच्या कामी त्याचीच घेऊ आम्ही हमी असा विचार आता भडगावकरांच्या मनात पक्का झाला आहे म्हणून लवकरात लवकर कार्यालय भडगावात होतील अशी आशा शासनाकडून अपेक्षित आहे