06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

*अवैध दारु वाहतुक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात*

0
IMG-20240416-WA0407

*अवैध दारु वाहतुक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात*

पाचोरा (प्रतिनिधि)–

*आबा सुर्यवंशी*

पाचोरा शहरातुन अवैधरित्या दारुच्या बाटल्या मोटरसायकल वरुन घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी कारवाई केली. या धडक कार्यवाही मुळे अवैधरित्या चोरटी दारु वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पाचोरा शहरात गस्तीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी व पो. काॅं. योगेश पाटील हे कर्तव्यावर असतांना रेल्वे स्थानक रोडवरील भगवती फोटो समोरुन मोटरसायकलवरुन दोन तरुण पिशवी घेवुन जात असल्याचे राहुल शिंपी यांच्या निदर्शनास येताच राहुल शिंपी व योगेश पाटील यांनी तरुणांची चौकशी करुन झडती घेतली असता त्यांच्या जवळील पिशवी मध्ये ६ हजार ६५० रुपये किंमतीच्या देशी व विदेशी दारुच्या बाटल्या आढळुन आल्या. शुभम सुरेश पाटील (वय – २६) व रविंद्र शाम कोळी (वय – २५) दोन्ही रा. उत्राण ता. एरंडोल यांना ३० हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed