06/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

पाचोर्‍याच्या लेकीचे यश कौतुकास्पद* वैशालीताई सुर्यवंशी *कर सहाय्यकपदी नियुक्त गरीमा पाटील चा सत्कार

0
IMG-20240416-WA0405

*पाचोर्‍याच्या लेकीचे यश कौतुकास्पद* वैशालीताई सुर्यवंशी

*कर सहाय्यकपदी नियुक्त गरीमा पाटील चा सत्कार

पाचोरा (प्रतिनिधी ) *आबा सुर्यवंशी*

. मोठ्या जिद्दीने अभ्यास करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या कठीण परिक्षेत यश संपादन करत करसहायकपदी नियुक्ती मिळवण्याचे गरीमा पाटीलचे यश अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी व्यक्त केले

पाचोरा येथील गरीमा निकित पाटील या तरूणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तिची कर सहायकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाचोर्‍याचा लौकीक उंचावणार्‍या या कर्तबगार कन्येचा आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत तिचा सत्कार केला. या प्रसंगी गरिमा पाटीलचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना यशाचे भरभरून कौतुक करत तिला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह डॉ. अस्मिताताई पाटील, अरूण पाटील, पप्पू राजपूत, अभिषेक खंडेलवाल, राजू काळे, संदीप शिसोदिया, विनोद राऊळ, अजय देवरे, अमोल पाटील यांच्यासह गरीमा पाटील चे वडील निकीत पाटील आई सुवर्णाताई पाटील आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed