*कै.ओंकारआप्पा वाघ यांच्या ९२ व्या जयंती निमित्त अभिवादन*

*कै.ओंकारआप्पा वाघ यांच्या ९२ व्या जयंती निमित्त अभिवादन*
जिल्हा रिपोर्टर – *आबासाहेब सुर्यवंशी
पाचोरा – खान्देशचे ढाण्या वाघ म्हणुन राजकारणात एकेकाळी दबदबा ठेवणारे ,सहकार महर्षी, जळगाव जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष पाचोरा मतदार संघांचे माजी आमदार, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कै.ओंकारआप्पा वाघ यांच्या ९२ व्या जयंती निमित्त बांबरुड राणीचे येथील राममनोहर लोहिया हायस्कूलच्या आवारातील कै. ओंकार आप्पांच्या स्मृती स्थळावर वाघ परिवार, हितचिंतक, आप्तेष्ट यांच्या वतीने दि.१३ मे रोजी जयंती साजरी करण्यात आली.
पाचोरा – भडगांव मतदार संघाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ , बाजार समितीचे माजी सभापती दगाजी वाघ, पिटीसी चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन व्हीं.टी जोशी, माजी सरपंच मधुकर वाघ, पंचायत समिती माजी गटनेते ललित वाघ यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी समस्त वाघ परिवारा चे सदस्य, आप्पांचे माजी स्विय्य सहाय्यक तथा पीटीसी संचालक विनय जकातदार, संचालक सतीश चौधरी, शशिकांत चंदिले, आदीं सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक,शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थांची उपस्थीती होती.