वीडियो न्यूज़ — लोहटार प्राथ.आरोग्य केंद्रात सावळागोंधळ!* ग्रामस्थांनी ठोकले कूलूप

*लोहटार प्राथ.आरोग्य केंद्रात सावळागोंधळ!*
ग्रामस्थांनी ठोकले कूलूप
बेजबाबदार डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या बदलीची मागणी
रिपोर्टर – *आबासाहेब सूर्यवंशी*
पाचोरा – तालुक्यातील
वीडियो न्यूज़
लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध प्रकारचे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गावातील आणि परिसरातील रूग्णांना या आरोग्य केंद्रात नियुक्ती वर असलेले बहुतेक डॉक्टर , कर्मचारी, नर्सेस बऱ्याच वेळा रुग्णालयात हजर राहत नसल्याने रूग्णांना वेळेवर उपचारसेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे . या आरोग्य केंद्रांवर तीन डॉक्टर नियुक्ती वर असल्याचे कळते.! या रूग्णालया च्या गलथान कारभारा वर कोणाचाच अंकुश आणि वैद्यकिय अधीक्षक,अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याने येथे सवला गोंधळ माजला आहे. दिनांक १४ मे मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता लोहटार गावातील एक गरीब महिला जनाबाई ह्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना लोह टार प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी आणले होते.मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर व कर्मचारी उपचार करण्याससाठी हजर नव्हते.ही घटना समजताच त्या पीडित महिलेचे गावातील नातेवाईक व ग्रामस्थ आरोग्य केंद्रात पोहोचले. आणि बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत तुम्हाला शिस्त लावणार कोण,? ग्रामीण रुग्णांची तपासणी करणार कोण? अशी विचारणा करून संताप व्यक्त केला. डॉक्टर आणि कर्मचारीच नसतील तर रुग्णालया केंद्रास कुलूप लावलेले बरे असे म्हणत ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. या आरोग्य केंद्रात नियुक्तीवर असलेले डॉक्टर व कर्मचारी नेहमीच उशिरा येतात किंवा गैरहजर असतात. उशिराने येतात आणि लवकर निघून जातात. सुट्टीचा उपभोग घेतात मात्र आल्यावर अर्ज फाडून टाकतात. आपल्या कर्तव्यात कसूर करतात असे अनेक गंभीर आरोप ग्रामस्थांनी या वेळी प्रसामाध्यमां समोर केले. येथील सर्वच डॉक्टर्स, आणि कर्मचारी, स्टाफची बदली करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे केली आहे. लोहटार प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास कुलूप ठोकल्याची माहिती समजताच पाचोरा वैद्यकिय अधीक्षक यांनी लोहटार आरोग्य केंद्राला भेट देवून पाहणी केली असता गैरहजर असलेल्या बेजबाबदारीने वागणाऱ्या डॉक्टर कर्मचाऱ्यांची चौकशी करणार असून त्यांना लेखी नोटीसा देखील देण्यात येतील. तसेच त्यांची बदली करता येईल का यावर देखील विचार होईल.आणि योग्य ती कारवाई तात्काळ केली जाईल. सदर केंद्र आरोग्य सेवेसाठी असल्याने रुग्णांना त्याचा फायदा वेळेवर होईल याकडे विशेष लक्ष दिले जाईल. असे वैद्यकीय अधीक्षक- डॉ.डी. के. टाक यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे.