05/07/2025
10022403281002240178Picsart_25-05-23_23-23-40-978Picsart_25-05-12_18-07-06-196

*म.रा.मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन*    *पुणे परिमंडळ भव्य कामगार मेळावा संपन्न       

0
IMG-20240515-WA0047

*म.रा.मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन*

*पुणे परिमंडळ

*पुणे परिमंडळ भव्य कामगार मेळावा संपन्न

आइडियल इंडिया न्यूज़

रिपोर्ट राहुल दाहोत्रे पुणे महाराष्ट्र

*दिनांक 12.05.2024 रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा भव्य कामगार मेळावा संपन्न झाला.*

*सदर मेळाव्याचे उद्घाटन मा. सतीश चव्हाण साहेब,महापारेषण संचालक (संचालन) मुंबई यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दिप प्रज्वल करुन करण्यात आले. या भव्य कामगार मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,मा.डॉ.संजय घोडके साहेब,केंद्रीय अध्यक्ष MVKS हे होते.*

*प्रमुख मार्गदर्शक मा.जे.एस.पाटील साहेब,राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन व मुख्य सल्लागार MVKS. आरक्षणाचा इतिहास आणि वर्तमान स्थिती या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन करताना आपल्या संघटनेने कर्मचाऱ्यासाठी न्यायालयीन लढा देऊन कर्मचाऱ्यांना आरक्षणा बरोबरच पदोन्नतीच्या आरक्षणाचा सुद्धा लाभ मिळवून दिला आहे. औरंगाबाद,नागपूर व जळगाव याची खाजगीकरण/फ्रॅंचाईझी झाली व नंतर या कंपन्या तग धरू शकल्या नाहीत व हे तिन्ही परिमंडळ शासनाकडे परत देण्यात आले, तसेच अनुकंपावर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या पालकांनी जर पुर्वी कास्ट व्हॅलिड केली नसेल तर तो कर्मचारी नोकरीस पात्र असू शकत नाही असे चुकीचे परिपत्रक कंपनीने काढले होते ते आपण रिवाईज करण्यास भाग पाडले,असे मार्गदर्शनात आदरणीय पाटील साहेबांनी मार्गदर्शनात व्यक्त केले.*

*मा.सतीश चव्हाण साहेब संचालक संचालन महापारेषण मुंबई यांनी मार्गदर्शन करताना कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन एकजुटीने कंपनीचे कार्य करण्याची काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.*

*तसेच मा.अंकुश नाळे साहेब, प्रादेशिक संचालक महावितरण पुणे,यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून महावितरण कंपनीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.मा.राजेंद्र पवार साहेब मुख्य अभियंता महावितरण पुणे, यांनी आपली मागासवर्गीय संघटना चार बलाढ्य संघटना पैकी एक असून या संघटनेस विचाराचे अधिष्ठान आहे,राज्यातील सर्व परिमंडळातून पुणे परिमंडळामधील या वर्षीची थकबाकी वसुली आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमाने एक नंबरला 1630 कोटी झालेली असून यासाठी सर्व श्रेणीतील अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली असल्याचे मत व्यक्त करून सर्व कर्मचाऱ्यांना स्फूर्ती दिली. प्रत्येक विषयाचे वाचन असले पाहिजे म्हणून कर्मचाऱ्यांना “वाचा म्हणजे वाचाल” असा सल्ला आदरणीय राजेंद्र पवार साहेब यांनी दिला*

*मा.डॉ.संजय घोडके साहेब केंद्रीय अध्यक्ष यांनी या भव्य कामगार मेळाव्यास रात्रीचा वारा पाऊस असताना सुद्धा व लाईन जागोजागी ब्रेक डाऊन असतानाही सर्व कामे उरकून सर्व लाईन चालू करून संघटनेचे सभासद मेळाव्यास उपस्थित राहिले असल्याचे सांगून कोरोना काळातही सर्व कर्मचारी व अधिकारी बांधवांनी त्यांना नेमून दिलेले काम सविस्तरपणे पार पडले आहे.मागील झालेल्या पगारवाढीचा प्रस्ताव मा.बावनकुळे साहेबांनी मागासवर्गीय संघटनेचा फायनल करण्यास सांगितले होते,आणि आता चालू पगारवाढ सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये मिळवून देण्यासाठी आपली संघटना प्रयत्नशील असल्याची माहिती दिली तसेच मा.सतीश चव्हाण साहेब यांनी देखील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची बाजू समजून घेऊन संघटनेला न्याय दिलेला आहे असे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष घोडके साहेब यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात व्यक्त केले.*

*मा.राजू गायकवाड साहेब महाव्यवस्थापक महापारेषण मुंबई,मा.वाय.डी.मेश्राम साहेब, अध्यक्ष बॅकवर्ड क्लास सीनियर इंजिनिअर्स अँड ऑफिसर्स असोसिएशन,मा.संजय मोरे साहेब केंद्रीय कार्याध्यक्ष MVKS, मा.सूर्यकांत जनबंधू साहेब केंद्रीय संघटक MVKS, मा. किशोर अहिवळे साहेब, केंद्रीय उपसरचिटणीस MVKS, मा.पी.एल.जाधव साहेब,केंद्रीय उपाध्यक्ष MVKS, मा.गणेश मुरकुटे साहेब,केंद्रीय उपाध्यक्ष MVKS यांचेही सदरील मेळाव्याच्या अनुषंगाने अनमोल असे मार्गदर्शन झाले.*

*सूत्रसंचलन मा.शिवलिंग बोरे,सचिव महावितरण व आभार मा.मनोज सूर्यवंशी,अध्यक्ष पुणे परिमंडळ यांनी व्यक्त केले,सदर मेळाव्यास मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी अधिकारी व बहुसंख्य सभासद उपस्थितीत होते असे संघटनेचे झोन अध्यक्ष म्हणून सूर्यवंशी यांनी कळविले आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed