दरोड्यातील सोळा लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त* मध्यप्रदेशातून दोन आरोपी चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात

*दरोड्यातील सोळा लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त*
मध्यप्रदेशातून दोन आरोपी चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात
रिपोर्टर – आबासाहेब सुर्यवंशी
चाळीसगाव – मेहुणबारे पोलीस स्टेशन भाग-५ गुरन. १३०/२०२४ भादवि.क. ३९५,३९७ दरोडयाचे गुन्हयातील आरोपीतां कडुन १६,७६,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
दि.१२ मे २०२४ रोजी मध्यरात्री अडीच ते तीन वाजे च्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोस्टे.हद्दीतील दहीवद या गावी घनश्याम धर्मराज पाटील वय २९ रा. दहीवद यांच्या राहते घरातील घराच्या पाठीमागे खिडकीचे गज कापुनते वाकुन घरात प्रवेश करुन सात अनोळखी इसमांनी गावठी कट्टयाचा धाक दाखवुन लोखंडी व लाकडी दांड्याने फिर्यादीस मारहाण करुन दरोडा टाकुन १६,७६,०००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल (त्यात सोन्याचे दागिने व मोबाईल चोरुन नेले बाबत मजकुराचे फिर्याद दिल्याने मेहुणबारे पोलीसस्टेशन येथे वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपासकामी वरीष्ठांचे सुचनेवरुन पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मध्य प्रदेश राज्यात जावुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने भामपुर या अति दुर्गम भागात जावून नियोजन बध्द रित्या माहीती संकलीत करुन सापळा रचुन आरोपी कालुसिंग हुजारीया बारेला (वय ५२) वर्ष रा.भामपुरा ता. सेंधवा जि. बडवाणी (मध्यप्रदेश), सुनिल मुरीलाल बारेला (वय-२१ )वर्षे रा.बुलवाणिया ता. सेंधवा जि. बडवाणी (मध्यप्रदेश), एक अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांचे कडुन खालील वर्णनाचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
१०,९२,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे १८२ ग्रॅम दागीने (१८ तोळे सोन्याचे दागिने), ५,००,०००/- रुपये किमतीचे गुन्हयात वापरलेले चारचाकी बोलेरो पिकअप वाहन, २०,०००/- किमंतीचीहोंडा शाईन काळ्या रंगाची मोटरसायकल
३०००/ -किंमतीचा वापरता मोबाईल, हॅकसों ब्लेड (करर्वत)
एकुण १६,१५,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर चाळीसगाव परीमंडळ, सहा.अप्पर पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख, चाळीसगाव भाग चाळीसगाव, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, स्थागुशा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप परदेशी, पोउनि सुहास आव्हाड, पोहेकॉ. राहुल सोनवणे, पोहेको. मनोहर शिंदे,नाशिक गुन्हे शाखा युनिट २. पोहेकॉ. गोकुळ सोनवणे, पोकाॅ. विजय पाटील पो. कॉ .आशुतोष सोनवणे, पो.का. रविद्र बच्छे, चाळीसगाव शहर पोस्टे, पोको.,गोरख चकोर नेम मेहुणबारे पोस्टे पोकॉ. ईश्वर पाटील, पोकों. गौरव पाटील स्थागुशा जळगाव यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि संदीप परदेशी व पोकॉ. निलेश लोहार व पथक करीत आहेत.