जवान चेतन हजारे यास देशसेवा बजावताना दिनांक 15 जून रोजी रात्री 10 वाजता वीरमरण आल्याची दुःखद घटना

आइडियल इंडिया न्यूज़
पाचोरा बाळासाहेब रिपोर्टर
पाचोरा शहरातील बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कार्यरत असलेला जवान चेतन हजारे यास देशसेवा बजावताना दिनांक 15 जून रोजी रात्री 10 वाजता वीरमरण आल्याची दुःखद घटना आज दिनांक 16 जून रविवार रोजी सकाळी 11 वाजता हाती आले आहे, या घटनेने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाचोरा शहरातील देशमुख वाडी भागातील 29 वर्षीय चेतन हजारे हा विवाहित तरुण मिझोराम येथील बॉर्डर सेक्युरिटी फोर्स येथे कार्यरत होता, आपले देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना दिनांक 15 जून रोजी रात्री 10 वाजता त्यास वीरमरण आले, सुमारे 10 वर्ष त्याने देशसेवा बजावली, त्याचे पश्चात आई, वडील, एक बहीण, जावई, पत्नी दोन मुले असा परिवार असून दिनांक 17 जून रोजी सकाळी 6 वाजता त्यांचे पार्थिव पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथील राहते घरी आणले जाणार असून सकाळी 9 वाजता त्याचे वर शासकीय इतमात अंत्यविधी पार पडणार आहे. या दुर्दैवी घटनेने पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.
वीर जवानास भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐💐💐
🇮🇳 जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (म.रा.)