नागरिकांना कायदेशीर रिक्षा स्टँड मिळूच नये ह्या साठी राजकारण आडवे आले
आइडियल इंडिया न्यूज़
रिपोर्टर देशपांडे अंबरनाथ मुंबई
नमस्कार
अंबरनाथ शहरातील पूर्व भागातील रिलायन्स रेसेडेंन्सी या विभागातील नागरिकांना कायदेशीर स्टेशन परिसरात शेरिंग रिक्षा स्टँड मिळावे त्यासाठी मी पत्रव्यवहार केला असता कल्याण आरटीओ कार्यालय येथील अधिकारी मा.प्रशांत पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वे करण्यात आला हा सर्वे फक्त दिशाभूल करण्याचा झाला त्यानंतर माझी प्रोसिजर थांबवण्यात आली चौकशी केली असता समजले नगरपालिकेचा विरोध वाहतूक विभाग येथून विरोध कल्याण आरटीओ येथे असणारे अधिकारी सांगतात नगरपालिका परमिशन देत नाही वाहतूक विभाग सांगतो स्टँड न देण्यासाठी आमदार डॉ बाळाजी किणीकर यांनी सही केल्याचे लेटर आमच्या कडे आले आहे. अंबरनाथ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील वाहतूक कोंडी चार प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रयत्न करतो परंतु नागरिकांना कायदेशीर रिक्षा स्टँड मिळूच नये ह्या साठी राजकारण आडवे आले हातगाड्या फेरीवाले यांना दिवसभर मनमर्जी प्रमाणे त्यांना पाहिजे तेवढ्या जागेवर ते कब्जा करू शकतात कारण त्यांना आशीर्वाद देणारे हात खूप मोठे आहेत आता नागरिक जागृक होईल तेव्हाच नागरिकांना रस्त्यावर चालताना त्रास होणार नाही.
आपला विश्वासू
आशिष रामकृष्ण देशपांडे
एक समाजसेवक