अंबरनाथ शहर पूर्व आनंद नगर* *एमआयडीसी हायवे रोड ठरतोय* *अपघातास कारणीभूत*

*अंबरनाथ शहर पूर्व आनंद नगर* *एमआयडीसी हायवे रोड ठरतोय* *अपघातास कारणीभूत*
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई
अंबरनाथ शहरातील पूर्व भागातील आनंद नगर एमआयडीसी हायवे येथील रस्ता नूकताच सिमेंट कांक्रिटचा करण्यात आला परंतु रस्त्याचा काही भाग सिमेंट कांक्रिटचा अर्धवट सोडत त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले पावसाचा जोर वाढल्याने ठेकेदाराचे पितळ उघडे पडले रस्याचे तीन तेरा वाजले असून डांबरीकरण चा रस्ता वाहून गेला आनंद नगर एमआयडीसी हायवे येथील रस्त्यावरून अनेक जड वाहनांची वर्दळ असून काही वाहने फास्ट गतीने जात असून ह्या ठिकाणी अती भयंकर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसून वेळीच उपाययोजना न केल्यास वाहन धारकांचा जीव सुद्धा जाऊ शकतो अंबरनाथ शहरातील पूर्व भागातील पनवेलकर प्लाझा समोरील रस्त्यावरील खड्डे,बी कॅबीन रोड येथील डिकोमा बिल्डिंग समोरील खड्डे, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील जागोजागी पडलेले खड्डे बुजवावे अशी मागणी रिक्षा चालक मोहन साबळे ,अमोल ऐतनबोने,प्रशांत जाधव, मनोहर पाटील हे करत असून महत्त्वाच्या रस्त्यावर पहिल्याच पावसात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचे निमंत्रण पालिका प्रशासन आता कशाप्रकारे स्वीकारणार हे पहावे लागणार असून रस्त्यांवरील खड्डे भरणी कधी करणार या कडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.