*गावात राजकीय द्वेशातुन तंटे होवु देवु नका*. पोलिस पाटलांना पोलिस प्रशासनाच्या सुचना!
*गावात राजकीय द्वेशातुन तंटे होवु देवु नका*. पोलिस पाटलांना पोलिस प्रशासनाच्या सुचना!
पाचोरा – *आबा सुर्यवंशी*
१३ मे रोजी होवु घातलेल्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असुन या दरम्यान गावात राजकीय द्वेशातुन काही मतभेद असतील व त्यातुन जर भांडण तंटे होवु शकत असतील तर त्याची माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवा. आचारसंहिता व निवडणूकी काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकडे बारकाईने लक्ष ठेवा अशा सुचना पोलिस उप अधीक्षक धनंजय येरुळे यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये घेण्यात आलेल्या पोलिस पाटलांच्या महत्वपूर्ण बैठकीत उपस्थित पोलिस पाटलांना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, पो. उ. नि. परशुराम दळवी, ग़ोपनिय शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल सुनिल पाटील, गजु काळे, पो. हेड काॅं. राहुल शिंपी, पो. काॅं. विनोद बेलदार, योगेश पाटील, सचिन पवार, दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे यांचेसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. पोलिस उप अधीक्षक धनंजय येरुळे यांनी पोलिस पाटलांना सुचना देतांना सांगितले की, आप आपल्या गावात लोकसभेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गावात जातीने लक्ष देणे आवश्यक आहे. गावात काही विघ्नसंतोषी व्यक्ती असतील तर त्यांची माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवा. अशा सुचना धनंजय येरुळे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु”, खाजोळा, टाकळी, होळ सांगवी, भडाळी, परधाडे, नाचणखेडा, बाळद बु” या गावात नविन पोलिस पाटलांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांचा धनंजय येरुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पहाण येथील ज्येष्ठ महिला पोलिस पाटील कल्पना महाजन यांच्या विशेष सत्कार करण्यात आला.
*२८ पोलिस शिपाई व १७ पोलिस नाईक यांची वार्षिक निरीक्षण तपासणी*
पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये सन – २०२३ – २०२४ या वर्षाची पोलिस शिपाई व पोलिस नाईक यांची वार्षिक निरीक्षण तपासणी पोलिस उप अधीक्षक धनंजय येरुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. २८ पोलिस शिपाई व १७ पोलिस नाईक यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कर्तव्यावर त्यांचे कार्य बघुन रिमार्क देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, परशुराम दळवी उपस्थित होते.