अंबरनाथ पूर्वेकडील अश्विनी* *हॉस्पिटलच्या समोर कचऱ्याचे ढिगारे* *नगरपालिकेचा कानाडोळा ** *स्थानिक नागरिक** *आणि येणाऱ्या* *जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा* *प्रश्न ऐरणीवर !*
*अंबरनाथ पूर्वेकडील अश्विनी* *हॉस्पिटलच्या समोर कचऱ्याचे ढिगारे* *नगरपालिकेचा कानाडोळा ** *स्थानिक नागरिक** *आणि येणाऱ्या* *जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा* *प्रश्न ऐरणीवर !*
*आयडियल इंडिया न्यूज*
*रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ* *मुंबई*
नैसर्गिक सानिध्यात वसलेले आपले अंबरनाथ शहर अनेक सोयी सुविधांनी संपन्न आणि मुंबई या शहरापासून जवळच असलेले अंबरनाथ शहर त्या मुळे लोकसंख्या अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.तसेच अनेक मोठ्या शहरातील नागरिक एक छोटी सहल म्हणून अंबरनाथ शहरात ची निवड करतात अंबरनाथ शहरातील शिवमंदिर हे
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने अनेक नागरिकांची सतत वर्दळ असते सोमवारी तर ह्या तीर्थयात्रा तील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भावीकांची गर्दी होत असते हे सर्व असताना अंबरनाथ शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठ मोठे ढीगारे पहावयास मिळतात.
अंबरनाथ शहरातील अश्विनी हॉस्पिटलच्या समोर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले पाहवयास मिळते रस्त्याच्या कडेलाच या कचऱ्याचा ढिगारा मोठ्या प्रमाणात असतो या ढिगारा कडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून दुर्लक्ष केले जात आहे.त्याच बरोबर या कचऱ्यामुळे येथील परीसरात कायम दुर्गंधी पसरलेली असून या दुर्गंधीचा नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसून अत्यंत महत्वाचे म्हणजे या परिसरात अश्विनी हॉस्पिटल आणि मराठी शाळा असून येथे मोठ्या संख्येने उपचारासाठी रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असून त्यांच्या आरोग्याची हमी कोण घेणार तसेच महत्त्वाचे म्हणजे या परिसरात असणारी मराठी शाळा या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात या विद्यार्थीन बरोबर इतर नागरिक यांना देखील याच कचऱ्याच्या ढिगार्यातून मार्ग काढून जावे लागते हा कचरा दररोज नगरपालिकेच्या माध्यमातून उचलावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.