लोकसभेच्याउमेदवार सौ स्मिताताई वाघ यांना निडणून आणण्यासाठी शिवसेना एक पाऊल पुढे*    आ.किशोर आप्पा पाटील 

*लोकसभेच्याउमेदवार सौ स्मिताताई वाघ यांना निडणून आणण्यासाठी शिवसेना एक पाऊल पुढे*

आ.किशोर आप्पा पाटील

———————————–

पाचोरा येथे शिवसेनेच्या स्नेह मेळावा कार्यक्रमात आमदारांचे वक्तव्य

आइडियल इंडिया न्यूज़

(जळगाव जिल्हा प्रतिनिधि)

*आबासाहेब सुर्यवंशी*

वीडियो देखें


पाचोरा दि. ७ मे – सारोळा रोड वरील समर्थलाॅन्स येथे पाचोरा भडगाव मतदार संघातील शिवसेना शाखा प्रमुख, बुथ प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांचा स्नेह मेळावा मतदासंघांचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तर जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे राधेश्याम चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे , यांची प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.विशाल पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समिती सभापती गणेश पाटील, उपसभापती पी.ए.पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख सुनील पाटील,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, माजी जि.प.सदस्य भुराआप्पा , विकास पाटील. पदमसिंग पाटील, पंढरीनाथ पाटील, डॉ.भरत पाटील, व्यापारी आघाडीचे पाचोरा तालुकाप्रमुख रवि केसवाणी ,समिती संचालक प्रकाश तांबे, युवासेनेचे जितेंद्र जैन, अनिल पाटील भावडू पाटील, सुमीत सावंत, भोला पाटील , आदीं सह दोन्ही तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

 

*भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे* यांनी मनोगतात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात भाजप पेक्षाही शिवसेना एक पाऊल पुढे मतदासंघांत उमेदवार सौ. स्मिताताई वाघ यांचा प्रचार करीत असल्याचे कौतुक केले. भविष्यात भाजपा देखील आप्पासाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दिली.

*शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील* यांनी उपस्थित बूथ प्रमुख, युवासेनेच्या पदाधिकारी यांनी प्रचायंत्रणा राबविताना पंतप्रधान मोदींनी देश, जनता आणि सर्व घटकांच्या विकासासाठी केंद्रातून केलेल्या कामांची मतदारांना द्यावी. तसेच मतदाना पूर्वी आपला मतदार बाबत महिती घ्यावी.दोन्ही तालुक्यातील ३३२ बूथ पैकी ज्या बूथ वर सर्वात जास्त मतदान कार्यकर्ते करून घेतील त्या बूथ प्रमुखांना ५१,हजार रुपयांचे बक्षीस आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

*भाजपा लोकसभा मतदासंघ संयोजक डॉ.राधेश्याम चौधरी* यांनी मतदानाच्या प्रक्रियेचे वर्गीकरण आणि मतदान यादीवाचन, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांनी मतदान कसे करुन घेतांना आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका,बचत गटाच्या महिलांना सोबत घेतल्यास १०० टक्के मतदान करून घेता येईल. या बाबत मार्गदर्शन केले.

*आमदार किशोरआप्पा पाटील* यांनी पाचोरा – भडगांव दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले की, शिवसेनेचा शिवसैनिक लोकसभा उमेदवार स्मिताताई वाघ यांना लोकसभेत निवडून देण्यासाठी सज्ज असल्याचे मेळाव्याच्या उपस्थितून दिसत आहे.बूथ प्रमुखांनी प्रचारात केंद्र, राज्य सरकारने जनतेसाठी केलेल्या कामांची माहिती देताना आपला मतदार कोण, कोठला, विरोधकांचे मतदार कोणते याची घेवून मतदार यादी बारकाईने वारंवार वाचून काढावी. टेक्नॉलॉजी फास्ट झाल्याने आता मतदार यादीत मतदारांना शोधणे सहज सोपे झाले आहे.२०२४ ची लोकसभा निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आणि अस्मितेची आहे. उमेदवार ह्या मतदार संघाच्याच नव्हे तर आमच्या भगिनी आम्ही मानतो. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसानिक आहोत.त्यांनी आम्हाला रडायचे नाही तर लढायचे शिकविले आहे.आज आमची शिवसेना भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिक पणे जिवाचं रान करत आहे. भविष्यात आम्हाला भाजप ची साथ जरी मिळाली नाही तरी आम्ही १०० टक्के निवडून येणारच आहोत. नियत आणि नैतिकता चांगली ठेवली तर परिणाम देखील चांगलेच मिळतात. आताचे राजकारण भावनेवर नव्हे तर विकासावर चालते. विरोधकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.त्यांना त्यांचा पंत प्रधान कोण हेच माहीत नाही. करण पवार आणि उन्मेष पाटील यांनी कोणती विकास कामे केली यावर आमदारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला. नरेन्द्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन आमदार यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रविण ब्राह्मणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *