*पै.पानसरे यांचे विविध क्षेत्रातील कार्य*

*पै.पानसरे यांचे विविध क्षेत्रातील कार्य*
आइडियल इंडिया न्यूज़
पै.पानसरे सीबी यांचा जन्म 1972 च्या दुष्काळामध्ये अशिक्षित आई-वडील असलेल्या ग्रामीण भागात म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील मजले चिंचोली (आव्हाडवाडी पांढरीच्या पुलाजवळ) अतिशय गरीब कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले .पुढे गावातच वीरभद्र विद्यालय या ठिकाणी त्यांनी आपली शालेय जीवनामध्ये विविध कार्यक्रमामधून चूनुक दाखवली. शाळा नवीन असल्यामुळे शाळेला ग्रँड नव्हती म्हणजे शाळेला कुठली शासकीय मदत मिळत नव्हती. शिकवणारे शिक्षक हे विना पगारी काम करत ही खंत मनाला भावली.त्यावेळेस गावातील व शेजारच्या गावातील काही राजकीय मंडळींनी शाळा वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते. शाळेसाठी इमारत निधी गोळा करण्यासाठी वाड्या वासल्यावर जाऊन पै- पैसे गोळा करणे हा राजकीय पुढाऱ्यांचा फंडा होता .पैसे नाही मिळाले तर धान्य गोळा करत असत परंतु ज्या वेळेस विद्यार्थी पानसरे आपल्या शिक्षकाकडे अभ्यास करण्यासाठी जात त्यावेळेस त्याच्या लक्षात आले की आपल्या शिक्षकाची परिस्थिती खूप हलकीची आहे. त्यांना पगार नाही . त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे.त्यासंदर्भात त्यांनी कमिटीकडे विचारणा केली. की आम्हाला जे शिक्षक शिकवतात ते उपाशीपोटी काम करत आहेत .परंतु कमिटीने एक छोटा मुलगा म्हणून दुर्लक्ष केले. पुढे 15 ऑगस्टला क्रांतिसिंह नाना पाटीलावर मी खूप छान भाषण करतोय व ते भाषण शिक्षकांना दाखवून भाषणं करण्याची परवानगी मिळवली .ज्यावेळेस स्टेजवर गेले त्यावेळेस त्यांनी आपलं मूळ भाषण बाजूला ठेवून आपल्या स्टेजवरील राजकीय नेते वाड्यावर जाऊन पैसे -धान्य गोळा करतात व मस्तपैकी आईष करतात .शिक्षकांना पगार देत नाही पगार जर मागायला गेले तर त्यांना हाकलून पण देतात. असा उल्लेख करून एक छोटासाच पोवाडा द्वारे सर्वांचे मन जिंकली. परंतु स्टेजवरील मान्यवरांना त्यांचा खूप राग आला..परंतु सत्य हे सत्यच असतं .हे त्यांनी दाखवून दिलं . परंतु राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले.काही काळ त्यांना शाळेपासून दूर राहावे लागले .परंतु सत्य परिस्थिती असल्यामुळे त्यांना परत आपल्या शाळेत हजर व्हावे लागले. पुढे नामदेवराव आव्हाड कॉम्रेड नेते यांनी मुळापाट पाणी कृती समितीसाठी गाव गाव जाऊन चर्चा करून आंदोलन करण्यास सुरुवात केली. समान पाणी वाटपाचा प्रश्न निर्माण केला गेला. पैलवान पानसरे हे त्यांच्या कार्यक्रमाला जात व पोवाडा मधून मुळापाठ पाणी कृती समितीचे कार्य स्पष्ट करत . वास्तव पाहता शाळेतील शिक्षकाचे पगार न दिल्याच्या कारणावरून कॉम्रेड नामदेवराव आव्हाड यांना त्यांचा राग आला होता. परंतु पैलवान पानसरेनी. मुळापाठ पाण्यासाठी एक सुंदर पोवाडा व भाषण बाजी पाहून नामदेवराव आव्हाड यांनी त्यांची पाठ थोपटली व प्रत्येक कार्यक्रमाला तात्या स्वतःते जातीने त्यांना घेऊन जात असत.त्यामुळे ते सर्वांचे चाहते झाले. मुळा पाठपाणि कृती समितीसाठी 1985च्या दशकात अनेक गावांमध्ये आंदोलन झाली या आंदोलनामध्ये अनेक वेळा भाग घेऊन मोठ्या नेत्याबरोबर तुरुंगात जाणे खूप काही आनंदाचे मानू लागले .त्या वेळेचे भाऊराव शिरसाठ खालची वाडी, सुरेश गवळी मिरी, मंत्री बबनराव ढाकणे पाथर्डी यांच्यासोबत पाट पाहण्यासाठी कार्य केले .मुळा ड्याम पासून तर करंजी पर्यंत जी पाईपलाईन झाली त्या पाईपलानीचा ते आज एक साक्षीदार आहेत . मुळापाट पाणी यासाठी अनेक ठिकाणी पैलवान पानसरे यांनी पोवाडा व भाषणाच्या रूपाने बालवयातच कार्य केले.बालवयामध्येच सत्तेसाठी लढा देण्याची उर्मी त्यांच्यात निर्माण झाली. तसेच उत्तम कलाकार पण होते .परंतु शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे जीवन चरित्र ऐकून व शेवटी त्यांच्या जीवनाची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांनी कलेला रामराम ठोकून शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याचे ठरवले . बाल वयातच आई-वडिलांचे क्षेत्र हरपले. मित्रासोबत त्यांना व्यायाम करण्याची ही आवड त्यांना बालवायापासूनच होती .त्यामुळे त्यांनी प्रत्येक गावच्या यात्रेत कुस्त्या करून बिदागी मिळवून . त्याच्यातूनच आपले शिक्षण चालू ठेवले. नंतर तिलोक जैन विद्यालय शिराळ चिचोंडी या ठिकाणी अकरावीचे शिक्षण घेत असताना कोल्हार गावातील टारर्गेट पोरांचा मुलींना होणारा त्रास पाहून एक चांगल्या मुलांची एकी करून टुकार मुलांना चोप देण्याचे ठरवले .ठरल्याप्रमाणे टुकार मुलांना धडा शिकवण्यासाठी सुरुवात केली. परंतु ऐनवेळी सत्यासाठी कोणी पुढे आले नाही सगळे मित्र पळून गेले .सदर प्रकरणात एकट्यालाच लढावे लागले व शेवटी जीत झाली .त्यांच्यासोबतले त्यांना साथ देणारे अनेक मित्र पळून गेले परंतु त्यांनी सत्य सोडले नाही. त्यामुळे ते शालेय सर्व शिक्षकांत व चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रिय झाले. रेसिडेंट हायस्कूलचे कारभारी गायकवाड यांच्यासोबती मुळे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले पुढे काही खास कार्यक्रमाचे नियोजन सुद्धा करण्यात आले परंतु कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचा घात झाल्यामुळे स्वप्न हे स्वप्नच राहिले व सगळे काम अधुरे झाले.पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे डिग्री पूर्ण करून डी एड ,बीएड , डबल पोस्ट ग्रॅज्युएट,एम फिल,पीएचडी. सध्या डीलीट चालू आहे.असा प्रवास करत शिक्षणाचे शिखर गाठले. शिक्षणासाठी इकडे तिकडे जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे ते स्वतः अनेक ठिकाणी सायकलीवर प्रवास करत . सायकल प्रवासामुळे तीन सायकल स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवले.कुस्तीच्या खेळाबरोबर इतर खेळांमध्ये भाग घेतला व 1993 मध्ये ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण होऊन गोल्ड मिडलचे मानकरी ठरले .पुढे अनुक्रमे 1994 -1995 राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल मिळवत नावलौकिक झाला .त्याचबरोबर खेळातून त्यांना अनेक मानसन्मान मिळत गेले हे करत असताना त्यांनी अनेक खेळातले मित्र घडवायचे प्रयत्न चालू ठेवले. कोणताही खेळ खेळणे व प्रत्येक खेळात भाग घेणे हे त्यांचे एक उद्दिष्ट ठरलेलं होतं. वेटलिफ्टिंग ,बॉक्सिंग, तायकांडो ,जुडो , ग्रीको रोमन व फीस्टयल कुस्ती अशा कुस्त्या करत 2007 मुंबई या ठिकाणी भरलेल्या आशियाई स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले .शालेय जीवनामध्ये उत्कृष्ट कार्य करत 2008 त्यांचा क्रीडा अधिकाऱ्यांनी विशेष कार्याबद्दल सत्कार केला .पुढे सायकलिंग व सायकल पोलो या खेळांमधून त्यांनी जवळजवळ शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आणेल खेळामधून विद्यार्थी घडवले. राजमाता अहिल्यानगरला चांगले अधिकारी आले व त्यांच्या बदल्या होतात यासंदर्भात त्यांनी आंदोलन करून होणारे अधिकाऱ्यांच्या बदल्या स्थगित केल्या. शांतता संयम नंतर कार्यक्रम या पद्धतीने त्यांना न भूतो न भविष्यती अशा कार्यक्रमास सुद्धा यश मिळाले. त्यांनी असेच विद्यार्थी घडविण्यास सुरुवात केली. माध्यमिक शिक्षक सोसायटीला तिकीट मिळेल या आशेने त्यांनी प्रयत्न केले .परंतु ते प्रयत्न असफल ठरले तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष एकत्र करून त्यांनी प्रथमच तिसऱ्या वंचित बहुजन आघाडी तयार करून समोरच्या दोन पॅनलला चांगला धडा शिकवला. विनायक मेटे यांच्या सहवासा जाऊन जय शिवसंग्राम पक्षात उत्तम काम करण्याची संधी मिळाली व विनायक मेटे यांनी त्यांना पदवीधर आमदारकीसाठी पूर्ण सहकार्य करू असा शब्द दिला परंतु काळाच्या ओघात विनायक मेटे यांचा घात झाला. कोरोना काळात अनेकांना मदत केलीच परंतु आवडते खेळाचा खूप सराव केला परंतु एक दिवस बैलाने मारल्यामुळे पूर्ण झालेली तयारी सोडून द्यावी लागली .पुढे शिवसंग्राम पक्षात सुरेश शेट्टी यांनी त्यांना चांगली साथ दिली.त्यानंतर 2023 मध्ये पदवीधर निवडणुकीमध्ये साखर सम्राटाविरुद्ध कुस्ती सम्राट म्हणून नाशिक जिल्ह्यात त्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. पैलवान पानसरे यांना भाजप मध्ये प्रवेश देऊन तुम्हाला पुढे आम्ही योग्य संधी देऊ असा शब्द दिला परंतु ती संधी न देता त्यामुळे पैलवान पानसरे यांनी पुन्हा मी उमेदवारी करणार असे स्पष्ट केले व ते कार्यपुढे उदयाला आले2024 लोकसभा निवडणुकीमध्ये आपले नाव स्पष्ट करून प्रस्थापितांना त्यांनी चांगलेच जैरीस आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेसाठी नाहीतर सत्यासाठी त्यांनी वेळोवेळी लढले हे करत असताना शिक्षक पालक विद्यार्थी व शेतकऱ्याच्या प्रश्नाला त्यांनी जागृती निर्माण करत प्राणी प्रश्न- पाणी प्रश्न तसेच शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये रस्त्याच्या संदर्भात आंदोलन करून यशस्वी केले. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा होऊन पुढील योग्य सूत्र आखण्यासाठी नियोजन तयार करण्यात आले होते परंतु जरांगे यांनी पुढे लोकसभा लढवायची नाही असं ठरवल्यानंतर काही विचार मागे पडले.शिक्षकाचे छोटेखानी प्रश्न सोडवण्यासाठी यश अनले पुढे शिक्षकाचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत वहोवेत याला यश आले.या कार्याबद्दल राहुरीचे तहसीलदार अधिकारी यांनी त्यांच्या शेतकरी मदत कार्याबद्दल शब्बासकी दिली.उतम विचाराचा प्रचार करत चांगल्या मित्राचा ग्रुप तयार केला.कला क्रीडा साहित्य क्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी मारली त्यांच्या कार्याबद्दल एकलव्य पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कला क्रीडा साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारलेली आहे त्याबद्दल त्यांचे अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत कॉम्रेड गोविंद पानसरे यांची निकटचा संबंध आला पैलवान पानसरे ही कॉम्रेड गोविंद पानसरे यांना गुरुस्थानी मानतात. यांचे मानसपुत्र म्हणून छोटे मोठे कार्य करत त्याच्या विचारातून निर्माण झालेली घोडदौड चालूच ठेवली आहे. पुढील कालावधी 288 जागा लढवण्याचा माणूस आहे त्यासाठी सध्या मायावतीचा बीएसपी या पक्षासोबत बोलणी झालेली असून सध्या हिंदुस्तान जनता पार्टी चे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष व भारतीय ओबीसी तिसरी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन पुढे चाल करत बचेंगे तो और लढेंगे असा लढा करत आहेत.