महाराष्ट्र एक्स्प्रेस व देवळाली भुसावळ या दोन्ही गाड्यांची वेळ पूर्ववत करण्यात यावी

*आइडियल इंडिया न्यूज़
चाळीसगाव रिपोर्टर संभाजी जाधव
महाराष्ट्र एक्स्प्रेस व देवळाली भुसावळ या दोन्ही गाड्यांची वेळ पूर्ववत करण्यात यावी तसेच मनमाड पर्यंत चालणारी अजंता एक्सप्रेसचा विस्तार भुसावळ पर्यंत करण्यात यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी आज रेल्वेचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री मिश्रा यांची मुंबई येथे भेट घेऊन बैठक घेत निवेदन दिले.*
*त्यानंतर श्री कुशल सिंह (मुख्य यात्री परिवहन प्रबंधक) व श्री शिवराज मानसपुरे, (डेप्युटी कमर्शियल प्रबंधक) यांची सुद्धा भेट घेत त्यांचे प्रवाश्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अश्या या विषयांकडे लक्ष वेधले.*
_*- आमदार मंगेश रमेश चव्हाण*_
#MaharashtraExpress #devlalibhusawalpassenger #AjantaExpress