केंद्र सरकार राज्य सरकार च्या माध्यमातून आलेला लेट पासिंग च्या जियारा पासून *वाहतूकदारांना आरटीओच्या दंड *वसूलीतून मिळावी मुक्तता* *यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* , *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *यांनी दिले आश्वासन*

*केंद्र सरकार राज्य सरकार च्या माध्यमातून आलेला लेट पासिंग च्या जियारा पासून *वाहतूकदारांना आरटीओच्या दंड *वसूलीतून मिळावी मुक्तता* *यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* , *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *यांनी दिले आश्वासन*
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर देशपांडे अंबरनाथ मुंबई
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत मार्ग काढण्याचे रिक्षा चालक मालक यांना देण्यात आले आश्वासन
महाराष्ट्रातील अनेक रिक्षा चालक मालक जे कोरोना संकटातून अद्याप बाहेर आले नसून आज सुद्धा कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत त्या मुळे महाराष्टातील अनेक रिक्षा चालक मालक यांचे वाहन योग्यता प्रमाणपत्र घेण्यास उशीर झालेला आहे लेट पासिंग रिक्षा, टॅक्सीसह वाहतूक,माल वाहतूक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना आरटिओच्या दंडा पासून मुक्तता मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे शिष्टाई करणार आहेत केंद्रीय रस्ते दळणवळण वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत लवकरच बैठक घेऊन या बाबत तातडीने तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
पुणे शहरातील ऑटो, रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.या वेळी आरटिओ च्या मनमानी कारभार विरोधात निवेदन देण्यात आले तसेच ऑटो टॅक्सी रिक्षा चालकांचे विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले असताना त्यांनी आश्वासन दिले.
संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या सोबत निवेदन देताना पुणे येथील फेडरेशन चे अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक आनंद तांबे, मनसे वाहतूक विभाग पुणे शहराध्यक्ष किशोर चिंतामणी, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे बापू भावे ,भाजप रिक्षा वाहतूक आघाडीचे अंकुश नवले , आमा आदमी पक्षाचे एकनाथ ढोले, शिवनेरी रिक्षा संघटनेचे आबा बाबर, एम आय एम रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाबा सय्यद, राष्ट्रवादी सेवा संघाचे विजय रवळे, तुषार पवार महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मुंबई चे कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील तसेच रिक्षा चालक मालक संघटनांचे अनेक मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यमंत्री पदी नियुक्ती झाल्या बद्दल मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या तसेच ऑटो टॅक्सी रिक्षा बस यासह प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक मालकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शासन दरबारी न्याय देण्याची मागणी केली.नूकतेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ( आरटिओ ) उशिरा वाहन प्रमाण पत्र नूतनीकरण करणाऱ्या वाहनांना दंडाचा भडगा उगारला आहे .प्रतिदिन पन्नास रुपये हा दंड सर्वांवर अन्यायकारक आहे अनेकांनवर लाखो रुपये भरण्याची वेळ आली आहे हातावर पोट असणाऱ्या या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे अशक्य नाही .त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतलेला हा निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली तसेच आमचा मुद्दा शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली या मागणीला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.